Thursday, 16 April 2026

उष्णतेच्या लाटांबाबत" ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती

 उष्णतेच्या लाटांबाबत" दिलखुलासकार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती

 

मुंबईदि. 16 : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावीतसेच उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या मानक कार्यपद्धती विषयी सविस्तर माहिती देणारा विशेष भाग प्रसारित करण्यात येत आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातून हा विशेष भाग शुक्रवार दि. 17एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.

 

उष्णतेचा प्रभाव असलेल्या देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असूननागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. विशेषतः बाहेर काम करणारे डिलिव्हरी कर्मचारीमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) मध्ये महत्त्वपूर्ण उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दिवसा काम टाळता न येणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तीन स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित या एसओपी मध्ये बाहेर काम करणारे असंघटित कामगारखाणकामगार तसेच उष्णतेला तोंड देणाऱ्या घरांच्या संकल्पनांचा समावेश आहे. एप्रिलमे आणि जून या तीव्र उष्णतेच्या काळात जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असूनया कालावधीत नागरिकांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावीयाची सविस्तर माहिती 'दिलखुलासकार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

0000

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड: 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त; एक आरोपी ताब्यात

  

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड:

4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्तएक आरोपी ताब्यात

 

मुंबई, दि. 16 : शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड  टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

 

            धाडीदरम्यान स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले आढळले. यामध्ये एचपीसीएलबीपीसीएलआयओसी आणि गो गॅस कंपनीचे एकूण 140 सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी 55 सिलेंडर भरलेले तर 85 सिलेंडर रिकामे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची एकूण किंमत 4 लाख 59 हजार 400 रुपये इतकी असून हा संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध साठा व नियमबाह्य वापराच्या संशयावरून करण्यात आली. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला चितळसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

 

 नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठाचर्चगेट यांच्या आदेशानुसार तसेच उपनियंत्रक शिधावाटप ’ परिमंडळठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आलेल्या या कारवाईत भरारी पथकातील अधिकारीशिधावाटप कार्यालय क्र. 41 ‘’ ठाणे येथील कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी सहभागी होते. व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आणि बेकायदेशीर साठा रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहे.

००००

आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


 आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबईदि. 16 : स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत  ठाणेपालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी सहा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. 

 

यावेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार स्नेहा दुबेआमदार परिणय फुके यांच्यासह स्व. लीलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेत देण्यात येत असलेल्या रुग्णवाहिकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्टआमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्याचा गौरव केला. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आदिवासी भागातील दुर्गमडोंगराळ गावामध्ये सहजरित्या रुग्णवाहिकेची सेवा मिळणार असल्याने आदिवासी बांधवांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार उपलब्ध होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोटी कोटी चीउड्डाणं महाराष्ट्र मध्ये उद्योगाची रोजगाराची हमी

 पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारत आहे. या माध्यमातून जवळपास ८ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यात जवळपास एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात फ्लोटिंग सोलर पावर अँड एनर्जी स्टोरेज च्या माध्यमातून कंपनी १४ हजार ९७६ कोटींची गुंतवणूक करीत असून त्यामुळे कायमस्वरूपी ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच शाश्वत कृत्रिम बुद्धिमत्ता कॅम्पस आणि डाटा सेंटरग्रीन हायड्रोजन प्रकल्पस्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिऍक्टर या क्षेत्रात जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह गुंतवणूक करीत आहे. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास ३ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

राज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेराज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू करण्यास सुटसुटीत प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यात शाश्वत ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये जेडब्ल्यू ग्लोबल च्या माध्यमातून गुंतवणूक येत आहे. केंद्र शासनाने सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याने स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये गुंतवणूक करण्यास देशात पुढाकार घेतला असून यासाठी दोन सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. राज्याच्या कुठल्याही भागामध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवल्यास राज्य शासन सबंधित उद्योग समूहाला पुरेपूर सहकार्य करेल.

आरे मेट्रो स्थानकाजवळील पादचारी पुलाबाबत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत,




 आरे मेट्रो स्थानकाजवळील पादचारी पुलाबाबत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत, सदर पूल येत्या १५ ते २० दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदार अतुल भातखळकर यांना दिले.


हा पूल बांधून बराच कालावधी लोटूनही तो अद्याप नागरिकांसाठी खुला न झाल्याबाबत आमदार भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. यावर अग्निशमन दलाचे आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) प्रलंबित असल्यामुळे पूल सुरू करण्यात आलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तसेच, या पुलावर उद्वाहन (लिफ्ट) सुविधा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधत नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ उद्वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनांना अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली.

यावेळी आमदार भातखळकर म्हणाले की, “नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला पूल तातडीने खुला होणे आवश्यक आहे. अन्यथा, आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यात येईल.”

या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करून पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रभावी

 राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे महिलांच्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. राज्यभर सखी केंद्रे व महिला आधारगृहांमध्ये एकसमान आणि परिणामकारक सेवा प्रणाली विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

बैठकीत सेवाभावी संस्थांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करणेन्यायालयीन प्रकरणांवर आधारित महिलांना योजनांचा लाभ देणेकौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्रांना अनुदान वाढविणे तसेच पोलीस ठाण्यांतील स्पेशल सेलच्या समुपदेशकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Featured post

Lakshvedhi