Friday, 17 April 2026

‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश · एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती

 एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी

प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

·         एकल महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीस गती

 

मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. एकल महिला धोरणाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तातडीने तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

एकल महिलांच्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सचिव अनुप कुमार यादवआयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूरउपायुक्त गिरासेउपसचिव भोंडवे तसेच अवर सचिव कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमहिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

 

एकल महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष हेल्थ कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनविविध ठिकाणी जनजागृती व सेवा शिबिरे घेऊन अधिकाधिक महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील एकल महिलांचे सामाजिकआर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मोठी चालना मिळणार आहे.

 

महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग

  

महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे

निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि.१६ : महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

 

पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त माधवी सरदेशमुख तसेच सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीविभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असूननिकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

 

मंत्री आदिती तटकरे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शकवेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देतनिकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार आहे.

०००

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत अॅग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरू

 राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत अॅग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरू

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई, दि. १६ : सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) येथे आता बीबीए इन अॅग्रीबिझनेस हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाने मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ६० प्रवेशक्षमतेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 

मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आढावा बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदी अधिकारी उपस्थित होते.

 

क्रेडिट फ्रेमवर्क’, ‘मल्टिपल एंट्री अँड एक्झिट’ आणि ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी)’ यांसारख्या तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान

 क्रेडिट फ्रेमवर्क’, ‘मल्टिपल एंट्री अँड एक्झिट’ आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी)’ यांसारख्या तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान संस्थाप्रमुखांना व्हावेतसेच अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नयेयासाठी हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले असून सातत्याने प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचेही  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  स्पष्ट केले.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसारराज्यातील सर्व विद्यापीठे तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

 

या नव्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महासार्कचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. चर्चासत्रात महासार्कचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तांत्रिक व प्रशासकीय अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन

 ऑनर्स’ व ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी

तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यसंचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

मुंबईदि. १६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने राज्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.  चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ऑनर्स’ व ऑनर्स विथ रिसर्चच्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यसंचालक,  प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व संबंधितांचा सहभाग अनिवार्य राहणार असल्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असूनशैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष लागू होत आहे. या नव्या टप्प्याची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकतासंशोधनाभिमुखता आणि विद्यार्थी-केंद्रितता वाढविण्यासाठी ही पुनर्रचना अत्यंत महत्त्वाची असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.

राज्यात प्रथम टप्प्यात 100 'महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार सुरू

 राज्यात प्रथम टप्प्यात 100 'महात्मा जोराव फुले

कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार सुरू

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

·         मुंबई शहर व उपनगरमध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करणार

 

     मुंबई, दि.16 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी  महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यात 100 केंद्र सुरु झाल्यानंतर आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजारपर्यंत संख्या वाढविणार आहे. ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात मुंबई शहर व उपनगरांमध्ये राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

        मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी यावेळी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा जोराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

वसई–विरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा

 वसईविरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा

-       राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. 16 : वसईविरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी. तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावीअशा  सूचना ऊर्जासार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणीपुरवठा व स्वच्छता  राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहात आयोजित वसईविरार मनपा क्षेत्रातील वीज समस्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार राजन नाईकआमदार स्नेहा दुबेआमदार विलास तरे ( दूरदृश्य प्रणालीद्वारे)  महापारेषणचे संचालक सतीश चव्हाणमहावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळेतसेच महानिर्मितीमहापारेषणमहावितरणचे संबंधित अधिकारी आणि वसईविरार महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यावसई विरार परिसरात सुरू असलेल्या विद्युत विषयक कामातील त्रुटीबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून  त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच फ्लाइंग स्क्वॉडचा प्रभावी वापर करून  याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत आमदार राजन नाईकस्नेहा दुबे  यांनीही वसई विरार भागातील वीज समस्यांबाबत माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi