Tuesday, 14 April 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ

 अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन स्वीकारण्यास मुदतवाढ

मुंबईदि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अर्ज किंवा निवेदने सादर करण्यासाठीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीशउच्च न्यायालयपाटणा) यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने शिफारशींसह दि. १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनास सादर केला होता. या अहवालावर पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. १० एप्रिल २०२६ च्या प्रसिद्धीपत्रकान्वयेसंबंधितांना आपल्या मते मांडण्यासाठी दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती तसेच सुनावणी दि. १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार होती.

मात्रसामाजिक संघटना तसेच विविध स्तरांतून कालावधी अपुरा असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसारdg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर अर्ज किंवा निवेदन सादर करण्यासाठी आता दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेचमुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर होणाऱ्या सुनावणीची वेळस्थळ व दिनांक याबाबतची माहिती यथावकाश कळविण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

000

Monday, 13 April 2026

रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

 रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरजतन व दुरुस्ती कामांसाठी

१५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

 

पुणेदि.१३ (जिमाका वृत्तसेवा) – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असूनपुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने  रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरयेथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतनदुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असूनसहाय्यक धर्मादाय आयुक्तपुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चाअभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्रभाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणाअधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री महागणपती मंदिरयेथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षिततासुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीतयासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्व लक्षात घेऊन मंदिर संस्थानजिल्हा प्रशासनपोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन पुरातत्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.

श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

 श्रीवर्धन समुद्रकिनारा ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. १३ :  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या उपक्रमामुळे पर्यटनवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा ब्लू फ्लॅग बीच’ विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटींपैकी १.४० कोटी निधी प्राप्त झाला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीस गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पर्यटन विभाग आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीश्रीवर्धन समुद्रकिनारा स्वच्छसुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. ब्लू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी स्वच्छ पाणीप्रभावी कचरा व्यवस्थापनसुरक्षितता उपाययोजना आणि पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. या सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावा.

 

तसेचपर्यावरणीय निकषांची पूर्तता करत जागतिक दर्जाचा समुद्रकिनारा विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेलतसेच पर्यावरण संवर्धनास हातभार लागेलअसेही त्यांनी नमूद केले.

 

ब्लू फ्लॅग बीच’ मानांकनामुळे श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग होऊन महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर त्याचे महत्त्व अधिक वाढेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

 पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव

लघु कालव्यांचे जाळे उभारणेपाणी साठवण आणि जलसंवर्धनशेतीपूरक विकासस्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. अहिल्यादेवींनी हे तत्त्व 250-300 वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीबवंचितशेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.

 


 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.

25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासनमहिला नेतृत्वलोककल्याणजलदृष्टी वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.

 

25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वरधुळे या मार्गाने इंदूर येथे 29 एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

  

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजन

 

मुंबईदि. 13 : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्यविचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटीलजलसंपदा ( विदर्भतापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेजलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

  

नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख

                                                               

            नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या मुलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी ६१ कोटी २४ लाख रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निधीतून ठाणेरायगडसिंधुदुर्गपालघर आणि रत्नागिरी येथील विविध ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

            सागरी जिल्ह्यांमधील मच्छिमारांसाठी मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधा नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत प्राप्त होणाऱ्या कर्जाद्वारे मासेमारीसाठी बंदरे व लहान धक्के बांधण्यात येतात. या योजनेत नाबार्डचा ९५ टक्के तर राज्याचा हिस्सा ५ टक्के असा असतो. यासाठी नाबार्डकडे सादर झालेल्या प्रस्तावातील काम पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावरील कामांसाठी हा ६१ कोटी २४ लाख रूपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दिवाळे गावरायगड जिल्ह्यातील बोर्ली मांडलादिघीराजपूरीनांदगावसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गपालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणूरत्नागिरी जिल्ह्यातील वेलदूर यांसह पाचू बंदरबोऱ्या आणि चिंबई यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या कामांच्या अंदाजपत्रकास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi