Monday, 13 April 2026

महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमहात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहेत. काही गंभीर ९ आजारांसाठी २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री जनकल्याण योजनामहात्मा फुले जनआरोग्य योजना व मुंबई महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी  लोकप्रतिनिधी म्हणून केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक सारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असूनविस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे. आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एकतसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक सारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर असल्यने रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार अत्यावश्यक होता.

मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार

 मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिकदर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा भव्य विस्तार

,२८६ खाटांची क्षमता होणार

हॉस्पिटलसाठी २५०० कोटी होणार खर्च

 

मुंबईदि.२७ :  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०० खाट संख्येवरून ३,२८६ खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारतकर्करोगआपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व  मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा  संकल्प  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग

 हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग


-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई दि.२६ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून फिलेरियासिसचा पूर्णतः नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,विशेषतः दुर्लक्षित असलेल्या फिलेरियासिससारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली होती. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, भारतातून फिलेरियासिस निर्मूलन करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीतही मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात

 सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड

नागपूरदि.26 : सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 हजारावर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुजलाम- सुफलाम सावनेर  होण्याच्या दिशेने सुरुवात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

               जगात युद्धाची परिस्थिती असताना भारत विश्वशांतीच्या दिशेने विचार करतो आणि विश्वशांतीसाठी विश्व महाआरतीचे सावनेर मध्ये झालेले आयोजन भूषणावह असल्याच्या भावना व्यक्त करून महाआरतीच्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

      श्री रामनवमीच्या पवित्र पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती विश्व विक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजनही त्यांचा हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल,आमदार डॉ. आशिष देशमुख ,माजी मंत्री रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

सर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न

 सर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न

नवोन्मेषाच्या दृष्टीने विभागाने भूमित्र’ चॅटबॉटव्हॉट्सॲपद्वारे सेवातसेच जीआयएस आधारित ई-मोजणी २.० सारख्या अत्याधुनिक प्रणाली विकसित केल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मोजणी प्रक्रिया जलद आणि अचूक करण्यात आली असून६३५ प्रकरणे एआयद्वारे सोडवण्यात आली आहेत. तसेच लँड डॅशबोर्डच्या माध्यमातून राज्यविभागजिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या माहितीचे विश्लेषणडेटा व्हिज्युअलायझेशन आणि निर्णय प्रक्रियेसाठी उपयुक्त साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 'विकसित महाराष्ट्र २०४७या दृष्टीकोनातून एकसंध युनिफाइड लँड मॅनेजमेंट सिस्टीम’ (युएलएमएस) विकसित करण्याचेही काम सुरू असूनसर्व जमीन संबंधित सेवा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न आहे. 

एकूणचजमाबंदी आयुक्त कार्यालयाने १५० दिवसांच्या कार्यक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकाभिमुखपारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

 १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात महिला व बालविकास विभाग प्रथम

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

 

मुंबई -  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव  यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या  हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

 

हा सेवाकर्मी उपक्रम राज्यातील शासकीय सेवांची प्रगती सर्वांगीणपणे मोजण्यासाठी तसेच पारदर्शककार्यक्षम आणि जबाबदार प्रशासनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला होता. या अंतर्गत विभागाच्या संघटनात्मक रचनासेवाप्रवेश नियमपदोन्नती व थेट भरती स्थितीगोपनीय अहवालांचे व्यवस्थापनअनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच विभागीय चौकशी प्रकरणांच्या निपटाऱ्यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

 

तसेच सेवाकर्मी टेक’ घटकाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल प्रशासनाची प्रगती तपासण्यात आली. यात पदोन्नती ट्रॅकिंग, ‘डिजिटल महापरद्वारे गोपनीय अहवालांचे डिजिटायझेशन, iGOT प्रशिक्षण पूर्णता आणि E-HRMS प्रणालीचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.

 

या  मूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळवणे हे महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्रशासन पद्धतीतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्कृष्ट सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

या यशाबद्दल  महिला व बालविकास विभागाच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असूनमहाराष्ट्रातील नागरिकांसाठी अधिक पारदर्शकप्रतिसादक्षम आणि नागरिक-केंद्रित प्रशासन बळकट होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi