Wednesday, 8 April 2026

डॅशबोर्डद्वारे मॉनिटरिंग

 डॅशबोर्डद्वारे मॉनिटरिंग

सर्व विभागांनी आपले ॲक्शन प्लॅन वित्त विभागासोबत समन्वय साधून 30 एप्रिलपर्यंत अंतिम करावेत. पुढील काळात सर्व प्रगतीचे डायनॅमिक मॉनिटरिंग डॅशबोर्डद्वारे केले जाईल. यामुळे प्रत्येक विभागाच्या कामाची नियमित आणि पारदर्शक समीक्षा होईलअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या कामाचे समाधान व्यक्त करत,या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी हा आता पुढचा महत्वाचा  टप्पा  असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन यावेळी केले.

प्रोजेक्ट पाइपलाईनवर भर

 प्रोजेक्ट पाइपलाईनवर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले कीराज्यात निधीची कमतरता नसून योग्य प्रोजेक्ट पाइपलाईनचा अभाव आहे. PPP, ADB, World Bank यांसारख्या विविध स्रोतांमधून निधी मिळवण्यासाठी सक्षम आणि तयार प्रकल्प आवश्यक आहेत. तसेच कोणतेही धोरण केवळ जाहीर करून चालणार नाही तर  सहा महिने आणि वर्षभरानंतर त्याचा प्रत्यक्ष परिणाम तपासला पाहिजे. धोरण निर्मिती आणि अमंलबजावणीच्या परिणामांचे मोजमाप आवश्यक आहे. यासाठी सर्व धोरणे मोजता येण्या योग्य  निर्देशकांवर आधारित असावीत.

प्रोजेक्ट पाइपलाईनवर भर

 प्रोजेक्ट पाइपलाईनवर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले कीराज्यात निधीची कमतरता नसून योग्य प्रोजेक्ट पाइपलाईनचा अभाव आहे. PPP, ADB, World Bank यांसारख्या विविध स्रोतांमधून निधी मिळवण्यासाठी सक्षम आणि तयार प्रकल्प आवश्यक आहेत. तसेच कोणतेही धोरण केवळ जाहीर करून चालणार नाही तर  सहा महिने आणि वर्षभरानंतर त्याचा प्रत्यक्ष परिणाम तपासला पाहिजे. धोरण निर्मिती आणि अमंलबजावणीच्या परिणामांचे मोजमाप आवश्यक आहे. यासाठी सर्व धोरणे मोजता येण्या योग्य  निर्देशकांवर आधारित असावीत.

 

वित्तीय शिस्तीच्या मर्यादेत नियोजन आवश्यक

 वित्तीय शिस्तीच्या मर्यादेत नियोजन आवश्यक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले कीया व्हिजनसाठी वेगळा मोठा निधी उपलब्ध होणार नाहीतर विद्यमान आर्थिक चौकटीतच (financial framework) काम करावे लागेल. बिझनेस ॲज युज्युअल पद्धतीत बदल करून नव्या कार्यपद्धती स्वीकारल्याशिवाय अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत. त्याचबरोबरकेंद्र सरकारच्या योजनांमधून (Central Sector आणि Centrally Sponsored Schemes) जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी विभागांनी सक्रिय प्रयत्न करावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.

 

कोणतेही व्हिजन हे त्याच्या अंमलबजावणीच्या ठोस धोरणाशिवाय केवळ कागदावर राहते.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकोणतेही व्हिजन हे त्याच्या अंमलबजावणीच्या ठोस  धोरणाशिवाय केवळ कागदावर राहते. त्यामुळेच राज्य शासनाने व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करून प्रत्येक विभागासोबत सखोल चर्चा केली असून2030 पर्यंत साध्य करता येतीलअशा उद्दिष्टांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. राज्याच्या विकासासाठी प्रगत जिल्ह्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक वेगाने वाढ करणे आणि राज्यातील मागासलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची संधी आहे त्याच्यावर काम झाले पाहिजेअसे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. काही जिल्हे अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे आहेत. हेच जिल्हे पुढील काळात राज्याच्या वाढीचे प्रमुख केंद्र ठरू शकतात. विभागांनी तयार केलेले ॲक्शन प्लॅन हे केवळ महत्त्वाकांक्षी नसून ते अचूककालबद्धमोजता येण्यायोग्य (specific, measurable, time-bound) असणे आवश्यक आहे. चार वर्षांत 100 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपल्या कामाच्या स्पष्ट कालमर्यादा आणि निर्देशक निश्चित करावेत.

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्यावा

  

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून

 ठोस अंमलबजावणीवर भर द्यावा

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         विकसित महाराष्ट्र 2047ला वेग

 

मुंबईदि. 8 : राज्य आणि देशासाठी  2026 ते 2030 हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झालीतर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हेतर दरडोई  उत्पन्नात  महाराष्ट्राला अग्रेसर  राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत 2030 पर्यंत मोजता येण्याजोगी उद्दिष्टे साध्य करण्यावर विभागांनी भर द्यावाअसे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी

 अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजेअवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असूनदात्यांची संख्या वाढविण्यासाठी राज्यभर जनजागृतीसमुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री आबिटकर यांनी सांगितले.

 

Featured post

Lakshvedhi