Friday, 13 February 2026

कांदळवन क्षेत्रातील वृक्षतोड आणि अनधिकृत भराव प्रकरणी संबंधित

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीकांदळवन क्षेत्रातील वृक्षतोड आणि अनधिकृत भराव प्रकरणी संबंधित विकासकावर लावण्यात आलेल्या ८७ कोटी रुपयांच्या दंडाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. संबंधित जागा ही बफर झोनमध्ये येत असल्याने पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई आवश्यक आहे.

या प्रकरणी चौकशीअंती २१ एप्रिल २०२५ रोजी ८७ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच अनधिकृत भराव टाकणाऱ्यांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.मौजे पहाडी, गोरेगाव (ता. बोरीवली) येथील खासगी जागेवरील सुमारे ३०० एकरपेक्षा अधिक क्षेत्र समुद्रकिनारी तसेच कांदळवन क्षेत्रात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई

 कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या

सूचनांनुसार कारवाई

— पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. ११ : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये अनधिकृत भराव टाकून कांदळवन वृक्षांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्या. प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार अपील सुनावणी घेऊन उच्च न्यायालयातील स्थगिती आदेशाबाबत आवश्यक कार्यवाही करावीअसे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात आढावा बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकामहसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करावा

 अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी

अहवाल सादर करावा


- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ११ : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून, येथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.


0000

प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा

 महासंचालक प्रवीण रंजन म्हणालेप्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.

भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक कुटुंब असल्याचे ' वसुधैव कुटुंबकम तत्व

 विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर म्हणालेभारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक  कुटुंब असल्याचे  वसुधैव कुटुंबकम तत्व आहे. विकसित भारतासाठी सुरक्षा दलांचे मोठे सहकार्य राहणार आहे. भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. सीआयएसएफ ने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआयएसएफचे कार्य उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉन हा उपक्रम लोकपयोगी आहे.

महासंचालक प्रवीण रंजन म्हणालेप्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन

 सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन

-  विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

·       वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्सायक्लोथॉन उपक्रम

 

मुंबई दि. ११: विविध सुरक्षा दलांमुळे  देशात विविध भाषासंस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्'  सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन घडत आहेअसे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ)  वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंच्या स्वागत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण रंजनअतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसेविजय कुमारक्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरदिग्दर्शक बोनी कपूरअभिनेता अहान शेट्टीविश्वचषक विजेत्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे उपस्थित होते.

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना ; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी

 सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना ;

फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावीया दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी,  असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसेसिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरीसंचालक अमित कामत आदी उपस्थित होते.

 

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

Featured post

Lakshvedhi