Friday, 6 February 2026

सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

 सीआयएसएफकडून रत्नागिरीत

वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

 

मुंबईदि. 4 : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफआपल्या 57 वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत 14 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलस मैदानावर वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’ या उपक्रमाचे आयोजन केले आहेया उपक्रमाचा रंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.


ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

 

ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना

 योजनेविषयी माहिती :

• मुंबई व महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील ऑटो रिक्षा व टॅक्सींसाठी ईटीएस३६० सार्वजनिक / महिला सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.

• ही योजना महाराष्ट्र मोटार वाहन विभाग तसेच मुंबई / महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्या सहकार्याने, ETS360 सोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येत आहे.

• प्रवासी आसनासमोर तसेच चालकाच्या मागील बाजूस क्यूआर कोडसह चालक / वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे.

• दिग्सी अ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर गुगल मॅपवर वाहनाचा मार्ग दिसतो.

या अ‍ॅपमध्ये एसओएस बटन असून ते सक्रिय केल्यास वाहनचालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस  नियंत्रण कक्ष ११२ येथे पाठवली जाते.

त्यानंतर जवळची गस्त घालणारी पोलीस व्हॅन वाहनाचा मागोवा घेऊन सुमारे ५ ते ६ मिनिटांत मदत उपलब्ध करून देते.

• मुंबई हे भारतातील असे तंत्रज्ञान सुरू करणारे पहिले शहर असूनमहाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

• ही सुविधा पुढीलप्रमाणे पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.

– राज्य शासनासाठी कोणताही खर्च नाही

– चालकांसाठी कोणताही खर्च नाही

– नागरिकांसाठी कोणताही खर्च नाही

• या योजनेचा खर्च कॉर्पोरेट निधीदेणग्या व कॉर्पोरेट प्रायोजकत्वातून केला जात आहे.

• ही योजना २३ जानेवारी २०२६वसंत पंचमीदिनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्शकार्यप्रणाली जाहीर

 

Saturday, 24 June 2023

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

 आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर

            मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात आली असून आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.


            धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवण्यात येऊन योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये राज्यातील एकुण 467 धर्मादाय रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी धर्मादाय योजनेमध्ये नमुद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालय योजनेनुसार रुग्णालयाकडून त्यांच्या एकुण खाटांच्या प्रत्येकी 10 टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निर्धन घटकासाठी 10 टक्के व दुर्बल घटकासाठी 10 टक्के राखीव खाटांची परिगणना करतेवेळी त्या रुग्णालयाच्या प्रत्येक श्रेणीतील खोली निहाय 10 टक्के खाटा सामान्य खोली व विशेष खोली याप्रमाणे करण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधेचा लाभ घेण्याकरिता मोफत उपचाराकरिता निर्धन व्यक्तींना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 80 हजार रूपये इतकी तर दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय योजनेनुसार 50 टक्के सवलतीच्या दराने उपचाराकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लक्ष 60 हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तसेच ओपीडी/आयपीडी च्या ठिकाणी ठळक अक्षरात प्रसिद्ध करावी, याबाबतचे स्पष्ट निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकात ज्या सेवांची किंमत आकारलेली आहे. अशा सेवा त्या रुग्णालयातील सर्वात खालच्या वर्गासाठी आकारलेल्या दरानेच आकारणे योजनेमध्ये नमुद आहे.


            औषधे व उपयोगात आणलेल्या वस्तु (कन्ज्युमेबल्स) व शरीराच्या आत लावलेल्या वस्तु (इंम्प्लांट्स) यांच्या दराची आकारणी मुळ खरेदी किंमतीच्या दराने देयकात आकारण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्याकरिता अथवा त्या सारख्या अन्य संवेदनशील आजारांवर उपचार करण्याकरिता दाखल असलेल्या रुग्णाला विशेष खोली उपलब्ध करुन देणे, त्याकरिता कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारणे. रुग्णाने तहसीलदाराकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांच्या वैयक्तीक आर्थिक परिस्थितीची कोणत्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही, याबाबतच्या सुचना आदर्श कार्यप्रणालीमध्ये नमुद आहेत.


            धर्मादाय योजनेनुसार रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेची इत्यंभुत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या कल्पनेतुन साकारण्यात येत असलेले मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असुन लवकरच त्याचे डिजीटल अनावरण लवकरच होणार आहे.


            या मोबाईल अप्लिकेशवर धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रत, योजना प्रभावी पणे राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीची प्रत मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच 467 धर्मादाय रुग्णालयांची जिल्हा निहाय यादी, रुग्णालयांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांची नावे, रुग्णालय निहाय राखीव असलेल्या व त्यापैकी उपलब्ध असलेल्या खाटांची वेळोवेळी अद्ययावत (Update) असलेली संख्या अप्लिकेशच्या मुख्य पृष्ठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            धर्मादाय रुग्णालय अथवा इतर कोणत्याही संदर्भात तक्रार करावयाची असल्यास मोबाईल अप्लिकेशनवर तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांना धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अनुषंगाने मदत मिळणे सुलभ व्हावे याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात येत आहे. रुग्णांना योजनेची माहिती उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा मिळवुन देण्यास मदत करण्याची महत्वाची जबाबदारी आरोग्य सेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य सेवकासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करुन देण्यात येत आहे.


            धर्मादाय रुग्णालयांकडून योजनेमध्ये नमुद केल्यानुसार रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी समिती तयार करण्यात आली आहे. ही तपासणी समिती वेळोवेळी धर्मादाय योजनेमध्ये व आदर्श कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमुद केलेल्या नियमानुसार रुग्णालयांकडून रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा पुरविण्यात येत असल्याबाबतची रूग्णालयांची पडताळणी करणार आहे. रुग्णालयांकडून दर्जेदार रूग्णसेवा पुरविण्यात येत नसल्यास अशा रूग्णालयांवर कठोर कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव धर्मादाय व आरोग्य विभागास सादर करण्याचे अधिकार समितीस असणार आहेत.


            निर्धन व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्यास दिरंगाई केल्यास विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान केल्याचे समजण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडून दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरजवंतांना वैद्यकिय सेवा देण्यास धर्मादाय रुग्णालयांकडून अथवा कोणत्याही व्यक्तीकडून दिरंगाई करण्यात आल्यास संबंधीतांवर दोन्ही सभागृहांचा हक्कभंग केल्याचे समजण्यात येउन त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तरी धर्मादाय रुग्णालय योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शीपणे रुग्णांना प्राप्त व्हावी या हेतुने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कल्पनेतुन या योजनेबाबतची आदर्श कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.


००००

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे

 पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे.

*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 


2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 


       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 


3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 


4)  एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 


5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 


6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 


      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 


      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 


         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 


           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 


6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 


           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 


झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

         

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 


       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 


          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 


8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.


🌳🌴🪴🍀🌿🌱🌳🙏 Copy paste Kara pan kiman 10 lokana pathava

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

२१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ४ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी सन २०२५-२६ वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठी अटी व शर्ती :- अर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याण विभागजिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

0000

फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

 फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

जलसंपदा विभागाने तयार केलेल्या फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीच्या आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे- पाटील यांनी दिले.

तसेच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे नियम१९७६ मध्ये प्रस्तावित बदल करण्याबाबतच्या तरतुदी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असूनत्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सिंचन प्रकल्पविकासकामे तसेच नदीजोड प्रकल्पांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती सादर करण्यात आली.

0000

नाबार्ड'च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी

 नाबार्ड'च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून त्यापैकी साडेआठ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. या निधीतून विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे वितरण करण्याबाबत वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे तसेच कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi