Thursday, 15 January 2026

119 कोटींच्या रस्ते रुंदीकरण कामांना वेग

 पुरंदरमध्ये 191 किलो मीटर रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी;

119 कोटींच्या रस्ते रुंदीकरण कामांना वेगपुरंदर 

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

नागपूरदि. १२ : पुरंदर तालुक्याचा रस्ते विकास वेगाने पुढे नेत 191 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीस शासनाने मंजुरी दिली असून अंदाजे 5 कोटी रुपयांच्या कामांना गती मिळाली आहे. यासोबतच 76 किमी सायकल ट्रॅकचे रुंदीकरण आणि एकूण 119 कोटी रुपयांची विस्तृत कामे पुरंदरमध्ये सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

सदस्य विजय शिवतारे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री भोसले म्हणाले कीपुरंदर तालुक्यातील 383 कि.मी. पंचायत समितीचे रस्ते व 268 कि.मी. एमडीआर रस्ते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने 191 कि.मी. रस्त्यांच्या दुरुस्तीस मंजुरी दिली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी 23 क्विंटलप्रमाणे कापूस खरेदी होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 प्रत्येक जिल्ह्यात हेक्टरी 23 क्विंटलप्रमाणे

कापूस खरेदी होणारमुख्यमंत्र्यांचे निर्देश

- पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत माहिती

 

नागपूरदि. 12 : अद्ययावत तंत्रज्ञान तसेच सिंचन प्रणालीचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे उच्चतम उत्पादन घेतो त्यानुसार राज्यात किमान हमीभाव योजनेंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यासाठी उच्चतम उत्पादकतानुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावा, असे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली

            शेतकरी सुधारित सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्रांचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहेत. मात्रप्रत्यक्षातील जादा उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणल्यावरउत्पादकता मर्यादा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही मर्यादा वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पणन मंत्री रावल तसेच विविध लोकप्रतिनिधींची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी करण्याचे निर्देश दिले.

            पीक कापणी प्रयोगांतील उच्चतम 25 टक्के उत्पादन विचारात घेऊन लातूरवर्धा व गडचिरोली या उच्च उत्पादन असलेल्या तीन जिल्ह्यांची सरासरी 23 क्विंटल आहे त्यानुसार सर्व जिल्ह्यासाठी 23 क्विंटल अशी राज्यभर मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.    ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप 2025 मध्ये उत्पादित कापूस एमएसपी खरेदीसाठीच लागू राहणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता नाही; महिला तक्रारीवरील तपास अंतिम टप्प्यात

 वृत्त क्र. 59

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता नाही;

महिला तक्रारीवरील तपास अंतिम टप्प्यात

- मंत्री डॉ. उदय सामंत

 

नागपूरदि. १२ : नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात आर्थिक अनियमितता प्रकरणी पोलीस चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कोणतीही अनियमितता आढळली नाही. महिला तक्रारीवरील प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईलअशी माहिती प्रभारी मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील आर्थिक अनियमितता व सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रार प्रकरणी सदस्य कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ.सामंत यांनी उत्तर दिले.

आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले की, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देयके योग्य प्रक्रियेनुसार मंजूर करण्यात आली आहेत. देयकांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे नमूद केले आहे. तसेचसंबंधित देयके संचालक मंडळाच्या ठरावानेच मंजूर करण्यात आली होतीअसे या अहवालात नमूद केल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

महिला तक्रारीवरील प्रकरणावर रस्तोगी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. वरिष्ठ महिला अधिकारी या समितीत असून ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. या समितीचा अहवाल शासनाकडे आल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

०००

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतपंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्रराज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावीया स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावीयासाठी तालुकाजिल्हामहसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्‍यात येत आहे.

ग्रामपंचायत सक्षमसुशासनयुक्तजलसमृद्धस्वच्छ व हरित गाव निर्माण करणेमनरेगा व इतर योजनांशी अभिसरणउपजिविका विकास व सामाजिक न्यायलोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार

 पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार

मंत्री डॉ.उदय सामंत

नागपूरदि. 12 : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईलअसे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते.

            मंत्री डॉ. सामंत म्हणाले कीपुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन विभाग आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

 राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते. यावेळी सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसीयांना तत्काळ सोपविण्यात येणार आहेज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा

 साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे किंवा स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली असूनपरवानगी मिळाल्यानंतर झाडे छाटणेपुनर्रोपण व वृक्षारोपणाची कार्यवाही पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे.

साडेसतरानळी गावाजवळील यश हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचणे व रस्ता खराब होण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच लेबरशेड मजूरवस्तीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने संबंधित मालकाशी ती ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू असूनजागा ताब्यात आल्यावर रस्ता विकासाची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi