राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नागपूर - मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. तसेच या महामार्गावर विविध पार्क उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 15 January 2026
समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार; एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन
समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार;
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
नागपूर, दि. १२ :- नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा
खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा खारघर सेक्टर- १६ येथील डीएव्ही स्कूल येथे सुरू होऊन सीबीडी बेलापूर मार्गे सीवूड्स सेक्टर-५२ मधील डीपीएस शाळेजवळ पाम बीच रोडला जोडला जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल रोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्ता उपलब्ध असून हा रस्ता जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.
तसेच विकास प्रकल्पांच्या कामात सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडको, पीएमसी, लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित
विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडको, पीएमसी, लोकप्रतिनिधींची
संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित निर्णय घेईल
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
नागपूर दि. १२ :- सिडको, पीएमसी हद्दीतील विकासकामाचे नियोजन, प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांवर देखरेख, नियंत्रण यासाठी महानगरपालिका प्रतिनिधी, सिडको प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य विक्रांत पाटील यांनी या संदर्भात विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.
कोविड काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालविण्यास देणे विचाराधीन
कोविड काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालविण्यास देणे विचाराधीन
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि. १२ :- राज्यात कोविड काळात अत्यावश्यक म्हणून उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देणे विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
कोविड काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट संदर्भात सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर,सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले की, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्सीजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देण्याबाबत बैठक घेण्यात आली असून याबाबतचा आराखडा करण्यात आला आहे.
खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) देण्यात येणारे ऑक्सिजन प्लांट आपत्कालीन परिस्थितीत पुन्हा शासनास वापरण्यास मिळतील असे सांगत मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट कोणत्याही परिस्थितीत विनावापर रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकांनी कोविड काळात उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटबाबत असाच निर्णय घेण्यासाठी कळविले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोविड काळात ऑक्सिजन प्लांट उभारणीमध्ये ज्या ठिकाणी अनियमितता झाली असेल त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील 173 गावे आणि 95 गावे
स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
नागपूर, दि. १२ : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील 173 गावे आणि 95 गावे या दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना नव्याने गती देत कामे पूर्ण करण्यासाठी तातडीची कार्यवाही सुरू असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य बबनराव यादव ( लोणीकर) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, 173 गावे योजनेवर आतापर्यंत 226 कोटी खर्च झाला आहे. 146 गावांमध्ये योजनेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील काही तांत्रिक अडचणी आणि महामार्गाच्या कामामुळे झालेल्या अडथळ्यांचे निराकरण जलदगतीने सुरू आहे. ज्या गावांमध्ये टॅपिंग पॉईंट उपलब्ध आहेत, त्या गावांना लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. 95 गावे प्रादेशिक योजना 87 गावांमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी विजबिलाशी संबंधित मुद्दे सोडवण्यासाठी विभागाने तातडीची पावले उचलली आहेत. दोन दिवसांत सर्व बंद गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुरंदरमध्ये एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क आणि मोठी गुंतवणूक
पुरंदरमध्ये एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क आणि मोठी गुंतवणूक येत असल्याने तालुक्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. गुणवत्ता हा आमचा मुख्य निकष असून कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. रस्त्यांवरील डीएलपीअंतर्गत उर्वरित कामे संबंधित ठेकेदारांकडून पूर्ण करून घेतली जात आहेत. अधिकारी किंवा कंत्राटदारांकडून कुठेही अनियमितता झाल्यास कडक चौकशी व आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, मांढरदेव यात्रेपूर्वी राजगड तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे दुरुस्त केले जातील असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...