Thursday, 15 January 2026

नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात.

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

 नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•        हडपसर - यवत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात

•        पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीची बैठक

 

नागपूरदि. 9 : नागपूर - चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  मुंबई शहरातील घाटकोपर पूर्वचेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे

 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे

मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन  या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सत्या नडेला यांच्या सोबत झालेल्या या बैठकीत आरोग्यशिक्षणकृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावर चर्चा  झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील त्यांच्या $17 अब्जांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्राने विकसित केलेल्या Marvel प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांच्या ऐवजी फक्त 24 तासांत शोधता येतात. ज्यामुळे लोकांचे पैसे वाचत आहेत आणि गुन्हेगारांना शोधणे अधिक जलद झाले आहे.  यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबलगनयांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या

मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर

 

मुंबईदि. 14 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास पाडू’ (प्रिंटींग ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादा‍त्मकरित्या त्याचा वापर केला जाईलअसे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल यूनिटला (सीयू) बॅलेट यूनिट (बीयू) जोडूनच करावीफक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादा‍त्मकरित्या पाडूचा वापर करावाअसे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादा‍त्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.

000

मतदान नक्की करा "महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून

 मतदान नक्की करा

"महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या शहराच्या- महानगराच्या जडणघडणीत योगदान द्यावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा. आपलं मत आपल्या शहराचं भवितव्य ठरवू शकतं. कारण ते अनमोल आहे. लोकशाहीतला तो आपला महत्वाचा हक्क आहे आणि तो आपण मतदानाच्या माध्यमातून बजवायला हवात्यासाठी आपण नक्की मतदान करावेअसे मतदारांना आवाहर केले आहे."

राजकीय पक्षांची बैठक

 राजकीय पक्षांची बैठक

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारीतसेच 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गच्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणीपोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदानमतमोजणीतसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत उपस्थित प्रतिनिधींना अवगत करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.

बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: 4 मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग असून यासह सर्व महानगरपालिका मिळून 893 प्रभाग आहेत. त्यात 2 हजार 869 जागांचा समावेश आहे. त्यासाठी 15 हजार 908 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Featured post

Lakshvedhi