Wednesday, 14 January 2026

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी

 राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या

निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी

                                                                -राज्य निवडणूक आयुक्त

 

मुंबई, दि. 13 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथील सह्याद्री अतिथिगृहात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प -

 २. कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प -

या प्रकल्पासाठी महाजेनको रिन्युएबल एनर्जी लि. (एमआरईएल) हे गुंतवणूक करणार असून कोयनाता.पाटण जि. सातारा येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची  ४०० स्थापित क्षमता (मे.वॅ) असून २,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २५०० रोजगार निर्मिती होणार आहे.

पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प -

 सामंजस्य करारातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची नावे व थोडक्यात माहिती

१. पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प  -

या प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यु निओ एनर्जी लिमिटेड हे गुंतवणूक करणार असून ता. भोरजि. पुणे व ता. महाडजि. रायगड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची  ५,२०० स्थापित क्षमता (मे.वॅ) असून १९,९५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७,००० रोजगार निर्मिती होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत

 राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे  रुपये ४.०६ लाख कोटी इतकी गुंतवणूक व १.२५ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीव

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीवर  आहे. आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे. केंद्र शासनाचे यात सहकार्य मिळत असून या प्रकल्पांना गती मिळणार आहे. नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील.

महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य

 महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

    राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार

    करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मितीत वाढ होणार या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार

    पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार

 

नागपूरदि. १० : राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे.महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

थोडक्यात विकास आराखडा

 थोडक्यात विकास आराखडा

स्वराज्य रक्षकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, 82 आसनी क्षमतेचा 10 डी शो सभागृहप्रशासकीय इमारतग्रंथालयस्मरणिका दुकानेप्रवेशद्वार, 350 मीटर लांबीचा नदी घाटवाहनतळशौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत.

समाधी स्थळ वढू बु येथे संग्रहालयप्रशासकीय इमारतस्मरणिका दुकानेप्रवेशद्वार१२० मीटर लांबीचा नदी घाटवाहनतळशौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत. तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची व्हिविंग गॅलरीअसणार. तसेच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना.

Featured post

Lakshvedhi