Sunday, 11 January 2026

संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग

 संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग आहे. पुस्तकी अभ्यासक्रमांमध्ये आपण लोकशाहीची मूल्येप्रक्रिया वाचतो. अभ्यासवर्गात मात्र ही प्रक्रिया जवळून बघता येते. राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे याचा नियम संविधानाने दिला. विधानसभा आणि विधानपरिषद या दोनही सभागृहाचे नियमत्यातील एक एक शब्दतरतूद संविधानाच्या आधारावरच झाली आहे. विधानमंडळाच्या कामकाजाची सुंदर रचना संविधानाने दिलीअसे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी

 संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

 

नागपूरदि. 9 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या  संविधानात नागरिकांच्या आशाआकांक्षाअपेक्षा पूर्ण करता येईलअशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाहीसंविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळतेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक

 प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेझेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. झेब्रुला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेलया पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल.

          कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेवाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीतयासाठी नागरिकांना वाहतूक साक्षरकरण्याचा शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

          नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. रस्ता सुरक्षा जीवन रक्षाहा मूलमंत्र अंगीकारावाअसे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. 

झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी

 'झेब्रुशुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•        रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

 

          नागपूरदि. 9 : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने 'झेब्रुशुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

          परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले.

     

सुधारित आखणीनंतर नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गातील बदल

 सुधारित आखणीनंतर नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गातील बदल

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावरील नवेगाव (मोर)पर्यंत महामार्ग बांधण्यात येणार आहे. याची लांबी 192 किलोमीटर असणार आहे. तसेच 11 किलोमीटर लांबीचा चंद्रपूर जोड रस्ता पूर्वीच्या आखणीनुसार कायम ठेवण्यात आला आहे. अशा एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मान्यता देण्यात आली आहे. सुधारित रस्ता आखणीमुळे 27 हेक्टर वन क्षेत्र संपादनात बचत होणार आहे.

राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून

 राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून मान्यता घ्यावी. प्रत्येक प्रकल्प गतिशक्ती पोर्टलकडून मान्यता आल्यानंतरच समितीच्या बैठकीसमोर यावाअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

          सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीत सादरीकरण केले. 

Featured post

Lakshvedhi