Sunday, 11 January 2026

झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक

 प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेझेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे. पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. झेब्रुला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे. झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेलया पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल. पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल.

          कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi