Monday, 12 January 2026

शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

 शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत

 पूर्ण करण्याचे नियोजन

-उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर दि. १२ : शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उर्वरित काम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी आणि शिवडी दरम्यानचा प्रवास अधिक जलद होईल. तसेच  वरळी ते अटल सेतू प्रवासात वेळेची बचत होण्यास मदत होईलअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

 

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी वरळी येथून जाणाऱ्या शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळणेबाबत विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगतापसुनील शिंदेप्रविण दरेकर आणि सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला

राज्यातील शाळांमध्ये ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगत,

 राज्यातील शाळांमध्ये शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगतशिक्षण विभागाशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाछत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनाछत्रपती शिवाजी महाराज महा-राजस्व समाधान शिबिरे या योजनांच्या माध्यमातून सरकार प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सुविधा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

००००

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी

राज्य शासन कटिबद्ध

-         राज्यमंत्री पंकज भोयर

 

नागपूरदि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसार व्हावायाबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. यावेळी सदस्य अमोल मिटकरीज.मो.अभ्यंकर यांनी चर्चेत सहभागी झाले होते.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणालेछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा योग्यसखोल व प्रेरणादायी परिचय मिळावा याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५

 मंत्री अदिती तटकरे म्हणाल्यातीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये ०.४१ इतके कमी झाले आहे. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये देखील कुपोषण मुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

           

या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्यास्वस्थ मातासशक्त बालक जन्माला यावेत यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न करण्यात येतात. दुर्गम भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातात. स्वच्छतागृहे चांगली केली जात आहेत. सर्व प्रसूती रुग्णालयातच व्हाव्यात यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. आयसीडीएस मार्फत राज्यात ४२,६०२ गरोदर माता आणि बालकांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तथापिराज्यात बालकांचे मृत्यू केवळ कुपोषणामुळे होत नसून त्यासाठी विविध कारणे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील

 कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील

-महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

 

नागपूरदि. १२ : राज्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मधील २४६ वरून २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत खाली आले आहे. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालविकासआरोग्यआदिवासी विकास या संबंधित विभागांची टीम तयार करण्यात येईलअसे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.

Sunday, 11 January 2026

प्रत्येक जिल्ह्यात किमान 20,000 चौ.फुटांचे मॉल

 प्रत्येक जिल्ह्यात किमान 20,000 चौ.फुटांचे मॉल उभारण्याचा विचार असून जिल्हा परिषदांकडून योग्य जागांची निवड सुरू असल्याचे मंत्री श्री.गोरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील महिला बचत गटाने

 ग्रामीण भागातील महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून महालक्ष्मी सरस’, जिल्हा आणि मिनी सरस अशा प्रदर्शनांचे आयोजन राज्यभर करण्यात येते. मात्र ही केंद्रे तात्पुरती असल्याने महिलांसाठी १२ महिने उपलब्ध असलेली कायमची बाजारपेठ तयार करण्याचा निर्णय म्हणजे उमेद मॉल’(जिल्हा विक्री केंद्र) असल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi