प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष (किऑस्क) स्थापन करणे बंधनकारक असून या कक्षात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी “आरोग्यमित्र” नियुक्त करण्यात आले आहेत. उपचार व सुविधा मिळण्यात अडचण आल्यास तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयक, क्षेत्रीय व्यवस्थापक, अंमलबजावणी सहाय्य संस्था आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती प्रत्येक रुग्णालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 8 January 2026
Wednesday, 7 January 2026
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना१५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली
मुंबई, दि. ०५: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित करून जानेवारी २०२५ पासून महत्त्वपूर्ण सुधारणा लागू केल्या आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असून उपचारांच्या दरात वाढ तसेच पेमेंट प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. उपचारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी एनएबीएच आणि एनक्यूएएस प्रमाणित रुग्णालयांना दावा रक्कमेतून प्रति उपचार १० ते १५ टक्के प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती” तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली “जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी” गठीत करण्यात आली आहे. नागरिकांना योजनांविषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ तास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — १५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५
दोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा
मंत्री मॅनफ्रेड लुखा म्हणाले, दोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणे, संशोधनाला चालना देणे तसेच परदेशी रोजगार संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल.
बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र व बाडेन-वुटेमबर्ग राज्यांमधील आरोग्यसेवा व नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक बळकट होणार आहे.
0000
या करारानुसार भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, या करारानुसार भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्था, विद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश आहे.
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी
-वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ
· महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार
मुंबई, दि. ०५ :- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, यांच्यासह अर्चना बडे, धीरेंद्र रामटेके, तसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहार, आरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण*
*दुर्मिळ आतड्यांच्या आजारावर वेळेत केलेल्या आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे ३ दिवसांच्या नवजात बाळाचे वाचले प्राण*
वेळीच निदान व आपत्कालीन शस्त्रक्रियेमुळे आतडयांना बसलेल्या जीवघेण्या पिळ्यातून नवजात बाळाला जीवनदान
*अलिबाग* : मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील डॉक्टरांनी इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस या दुर्मिळ आणि जन्मजात आतड्यांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या केवळ ३ दिवसांच्या नवजात बाळावर यशस्वी उपचार केले. हा आजार वेळेत उपचार न झाल्यास काही तासांत जीवघेणा ठरू शकतो. लक्षणांची लवकर ओळख, तातडीची तपासणी आणि योग्य वेळी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यामुळे बाळाचे प्राण वाचवणे शक्य झाले.
हे बाळ मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथेच जन्माला आले होते आणि सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाला दूध पिण्यात अडचण येऊ लागली आणि प्रत्येक फीडनंतर उलट्या होऊ लागल्या. ही धोक्याची चिन्हे ओळखताच बालरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने सखोल तपासण्या सुरू केल्या.
*या प्रकरणाबाबत माहिती देताना डॉ. परितोषा दलाल, सल्लागार – बालरोग व नवजात शल्यचिकीत्सक, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर म्हणाल्या,* “ही अवस्था म्हणजे शस्त्रक्रियेची तातडीची गरज असलेली आपत्कालीन परिस्थिती आहे. बाळाची तत्काळ तपासणी करण्यात आली आणि तातडीची पोटाची सोनोग्राफी तसेच इतर उच्चस्तरीय तपासण्या केल्या. त्यामध्ये लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अडथळा निर्माण करणारा इंटेस्टाइनल मॅलरोटेशन विथ मिडगट व्हॉल्व्युलस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत चुकीच्या पद्धतीने बसलेली आतडी स्वतःच्या रक्तपुरवठ्याभोवती (सुपीरियर मेसेन्टेरिक आर्टरी) वळतात, ज्यामुळे आतड्यांना जाणारा रक्तपुरवठा थांबण्याचा आणि आतडी सडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बाळाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.”
*त्या पुढे म्हणाल्या* , “अशा परिस्थितीत रक्तपुरवठा तात्काळ पूर्ववत करणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा आतड्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.”
डॉ. परितोषा दलाल यांच्या नेतृत्वाखालील नवजात शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक आतड्यांवर बसलेला पीळ सोडवून त्वरित रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला आणि गँग्रीन होण्यापासून आतड्यांचे संरक्षण केले. या वेळी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे बाळाची पचनसंस्था सुरक्षित राहिली.
त्या पुढे सांगतात, “अशा नवजात बाळांना नेक्रोटायझिंग एंटरोकॉलायटिस (NEC) या गंभीर आजाराचा धोका अधिक असतो, ज्यामुळे आतड्याला छिद्र पडू शकते. या बाळामध्येही पुढे अशीच स्थिती निर्माण झाली आणि खराब झालेला आतड्याचा भाग काढण्यासाठी आणखी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (NICU) ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि सखोल नवजात व शस्त्रक्रियात्मक उपचार देण्यात आले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली आणि त्याला घरी सोडण्यात आले. सध्या बाळाचे वजनवाढ व आहार नियमितपणे तपासला जात असून त्याच्या वाढीत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.”
आनंद मोटे, क्लस्टर डायरेक्टर, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल्समध्ये दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सातत्याने दिली जाते. या प्रकरणातून विविध तज्ज्ञ विभागांमधील समन्वय, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एका छताखाली उपलब्ध असलेल्या सखोल वैद्यकीय अनुभवाचे महत्त्व अधोरेखित होते.”
ही शस्त्रक्रिया बहुवैद्यकीय पथकाच्या सहकार्याने पार पडली. या पथकात बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. परितोषा दलाल, बालरोगतज्ज्ञ डॉ. मुबाशिशीर खान (निओनॅटोलॉजिस्ट) आणि डॉ. उज्ज्वला केसकर, तसेच नवजात अतिदक्षता विभाग आणि रेडिओलॉजी टीमचा समावेश होता.
हे यशस्वी प्रकरण नवजात बाळांमधील जीवघेणाऱ्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी वेळीच निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि रुग्णालयातील एकत्रित तज्ज्ञ सेवांची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.
विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप
कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.
प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
