Wednesday, 7 January 2026

यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल

 सचिव मुंढे म्हणालेअली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल तसेच संस्थेच्या अधिकृत तपासणीवर आधारित नसलेले अहवाल राज्य व केंद्र शासनाच्या विविध सवलती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडे सादर केले जात असल्याचेही काही ठिकाणी आढळून आले आहे.

   

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्राधिकरणांनी यूडीआयडी कार्ड या संस्थेमार्फत जारी केल्याचे दर्शविण्यात येणारे सर्व श्रवण व भाषण तपासणी अहवाल पडताळणीसाठी संस्थेच्या अधिकृत ayjnihh-mum@nic.in ई-मेल पत्त्यावर पाठविणे अनिवार्य असल्याचे प्रसिद्धीपत्रक अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटने काढले आहे. त्यानुसार कार्यालयांनी तत्काळ कार्यवाही करावी तसेच चुकीची माहिती देऊन दिव्यांगांचे प्रमाणपत्र अथवा लाभ घेऊ नये असे आवाहन सचिव मुंढे यांनी केले आहे.

००००

व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

  व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

-         सचिव तुकाराम मुंढे

·         बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई

 

            मुंबईदि. ०५ : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडीहे शासकीयनिमशासकीय नोकरीतील आरक्षणविविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्रअलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 

चुकीचे किंवा बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गुन्हा असूनअशा प्रकरणांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम२०१६ मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रम नियोजनासाठी गठीत समित्या पुढीलप्रमाणे

 कार्यक्रम नियोजनासाठी गठीत समित्या पुढीलप्रमाणे :

जागरण व्यवस्थापन समितीमैदान व्यवस्थापन समितीमंडप व्यवस्थापन समितीसार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समितीसुरक्षा व्यवस्थापन समितीस्वयंसेवक व्यवस्थापन समितीअतिथी स्वागत समितीलंगर/भोजन व्यवस्थापन समितीस्वच्छता व्यवस्थापन समितीवैद्यकीय सेवा समितीविद्युत व ध्वनी व्यवस्थापन समितीप्रसिद्धी व मीडिया समितीकार्यक्रम सादरीकरण समितीध्वज व सजावट समितीआर्थिक व्यवस्थापन समितीशासकीय परवानगी समितीजुताघर व्यवस्थापन समितीजलपुरवठा समितीमहिला सेवा समितीज्येष्ठ नागरिक समितीजिल्हा समन्वय समितीस्वरूपा व्यवस्थापन समितीसुरक्षा व तपासणी समितीनिवास व्यवस्थापन समितीप्रदर्शनी समिती व राखीव समिती.

या समित्यांमध्ये शासकीय अधिकारीगुरुद्वारा प्रशासनातील प्रतिनिधी तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली असूनसर्वांच्या सहकार्याने हिंद-दी-चादर शहीदी समागम कार्यक्रम संस्मरणीय ठरेलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

  

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी

 - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

·         २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन

·         हिंद-दी-चादर शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

 

नांदेडदि. ५ :हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारीकर्मचारीगुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या २५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धनियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीने नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता. "राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल", असा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

 शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपीया गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.

"राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल"असा इशारा अन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

  

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा

३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त

 अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

 

मुंबईदि. ५ : राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील 'मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुन्यांमध्ये अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार 'निकोटिनपॉझिटिव्ह आढळल्याने शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले आहे. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्सकच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपयांचा साठा जप्त करून कंपनी सील करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३(५)१२३२२३२७४२७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०२६२७५९) नुसार आरोपींविरुद्ध अनिल कुमार चौहानअसिफ फाजलानीफैजल फाजलानीमे. सोएक्स इंडिया प्रा. ली. विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या 'अफजलब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!


 महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई दि. ७ जानेवारी २०२५ : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. प्रसिद्ध 'वर्कप्लेस कल्चर' कन्सल्टिंग फर्म 'अवतार ग्रुप' तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडिया’ (TCWI) २०२५ च्या अहवालात मुंबईने ५ वे स्थान पटकावले आहे. या यादीत कर्नाटकची राजधानी बेंगळुरूने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.


मुंबईची कामगिरी: औद्योगिक प्रगती मोठी, पण महागाईचे आव्हान

या सर्वेक्षणात मुंबईच्या कामगिरीचे दोन पैलू समोर आले आहेत. मुंबईचा 'औद्योगिक समावेशकता निर्देशांक' (IIS) तब्बल ६९.०० इतका उच्च आहे, जो महिलांसाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधी दर्शवतो. मात्र, 'सामाजिक समावेशकता' (SIS) श्रेणीत मुंबई ३८.४४ गुणांसह काहीशी मागे पडली आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती (Affordability) आणि वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवरील ताण ही महिलांसाठी प्रमुख आव्हाने ठरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


टॉप १० शहरांची क्रमवारी

२०२५ च्या या अहवालात १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये खालील शहरांनी बाजी मारली आहे: १. बेंगळुरू (५३.२९ गुण)


२. चेन्नई (४९.८६ गुण)


३. पुणे (४६.२७ गुण)


४. हैदराबाद (४६.०४ गुण)


५. मुंबई (४४.४९ गुण) ६. गुरुग्राम, ७. कोलकाता, ८. अहमदाबाद, ९. तिरुवनंतपुरम, १०. कोईम्बतूर.


दक्षिण भारताचे वर्चस्व आणि उत्तर भारताची स्थिती

देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि पोषक वातावरण देणाऱ्या पहिल्या १० शहरांपैकी ५ शहरे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारताचा सरासरी स्कोर २१.६० इतका असून तो देशात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, उत्तर भारतातून केवळ गुरुग्राम हे एकमेव शहर टॉप १० मध्ये (६ वे स्थान) स्थान मिळवू शकले आहे. दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा येथे नोकऱ्या भरपूर असल्या तरी, सुरक्षा आणि सामाजिक निकषांवर ही शहरे मागे आहेत.


पुणे तिसऱ्या क्रमांकावर; महाराष्ट्राची छाप

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणे शहराने ४६.२७ गुणांसह देशात तिसरे स्थान पटकावले आहे. पुण्याने सामाजिक सुरक्षा आणि औद्योगिक वाढ या दोन्ही बाबतीत उत्तम समतोल साधला आहे, असे अहवालात म्हटले आहे.


तज्ज्ञांचे मत

अवतार ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या की, "शहरे महिलांसाठी किती पोषक आहेत, हे केवळ नोकऱ्यांवरून ठरत नाही, तर तिथे महिला खरोखर प्रगती करू शकतात का, हे महत्त्वाचे आहे. जेव्हा सरकार, संस्था आणि समाज एकत्र येतात, तेव्हाच महिलांची खऱ्या अर्थाने प्रगती होते, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते."


हा अहवाल धोरणकर्ते आणि शहरी नियोजकांसाठी एक मार्गदर्शक ठरणार असून, टायर-२ शहरांनीही या शर्यतीत घेतलेली झेप आश्वासक मानली जात आहे.




=====================

Featured post

Lakshvedhi