Tuesday, 6 January 2026

पुरंदर विमानतल से पुणे क्षेत्र के औद्योगिक विकास को बढ़ावा

 पुरंदर विमानतल से पुणे क्षेत्र के औद्योगिक विकास को बढ़ावा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विमानतल परियोजना से प्रभावित गांवों के प्रतिनिधियों से मुख्यमंत्री का संवाद

 

• पुरंदर विमानतल के लिए भूमि अधिग्रहण में अधिकतम दर देने पर विचार

• विमानतल परिसर में छत्रपति संभाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी

• परियोजना-प्रभावित किसानों के बच्चों के लिए कौशल विकास केंद्रनौकरियों में प्राथमिकता

• परियोजना-प्रभावितों को विशेष रूप से परियोजना-ग्रस्त प्रमाणपत्र दिया जाएगा

 

मुंबई23 दिसंबर:पुणे में अनेक उद्योग आने के लिए इच्छुक हैं और इसके लिए पुरंदर विमानतल अत्यंत महत्वपूर्ण साबित होगा। इस विमानतल से पुणे और आसपास के क्षेत्र के औद्योगिक विकास को गति मिलेगी। यह केवल यात्री विमानतल नहीं बल्कि कार्गो विमानतल भी होगाजिससे नाशवान (परिशेबल) वस्तुओं के व्यापार को विशेष लाभ मिलेगा। इस परियोजना से पुरंदर और आसपास के नागरिकों को बड़ा फायदा होगा तथा पुणे के सकल घरेलू उत्पाद (जीडीपी) में कम से कम 2 प्रतिशत की वृद्धि होगीऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी

 सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी देखील स्वतंत्र आढावा  घेण्यात आला. या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावीतसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

००००

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी

 भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, दि. २३ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावाअशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

 

राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे उभारण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी आवश्यक असलेली जमीन तत्काळ संपादित करावी. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असूनत्यांच्या स्मृती जपणारे स्मारक भव्य व दिव्य स्वरूपाचे असावेयासाठी सर्व संबंधित विभागांनी व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी देखील स्वतंत्र आढावा  घेण्यात आला. या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावीतसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एक लोकचळवळ आहे. त्यामुळे सर्व अधिकारीकर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्राधान्य देऊन काम केल्यास गाव विकासाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि राज्यातील पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम बनेलअसा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

0000

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान

 ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले कीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान असून त्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पंचायत समितीग्रामपंचायतविविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्यासच अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.

 

अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी पारंपरिक तसेच आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ग्रामसभांमधून जनजागृती करणेमाहिती फलकभित्तीपत्रकेडिजिटल माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अभियानाची उद्दिष्टेलाभ आणि अपेक्षित सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी

– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, दि. २३ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आणि प्राधान्याने काम करावेविशेषतः जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावेअसे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात अभियानाची अंमलबजावणीप्रचाराच्या कार्यपद्धती आणि जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास’ मध्ये मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणेनिदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

           

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळीघसाआवाजलाळ ग्रंथीनाकसायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावरगिळण्यावरश्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवरमुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणेवेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

Featured post

Lakshvedhi