Saturday, 6 December 2025

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम -

 आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 03 :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुखअधिक सक्षमतंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला राज्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्यआरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधीआरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायकसचिव ई. रविंद्रनआरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकरआणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

 राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

       मुंबई,दि.५: वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची  कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीसाठी  देण्यात येणारी कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

           मंत्रालयात वाळू धोरणासंदर्भात बैठकआयोजित करण्यात आली होती.यावेळी या बैठकीत  दूरदृश्यप्रणालीव्दारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, राज्यातील सर्व महसूल विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

            महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वाळू घाटांचे लिलाव विहित वेळेत होण्यासाठी महसूल अधिका-यांनी  गतीने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. या लिलावासाठी पर्यावरण व महसूल विभागाने परस्पर सामंजस्य पध्दतीने काम करावे. पर्यावरण विभागाकडून मिळालेल्या परवानगीनंतर कोणताही विलंब न लावता वाळू घाटाचे लिलाव केले जावेत.वाळूचा अवैध उपसा व वाहतूक,चोरी होऊ नये यासाठी कायदेशीर काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या.

                महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी  विभागनिहाय व जिल्हानिहाय वाळू धोरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

0000

राज्य शासनाचे हे पाऊल नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि पूर्णपणे कॅशलेस आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी

 राज्य शासनाचे हे पाऊल नागरिकांना दर्जेदारवेळेवर आणि पूर्णपणे कॅशलेस आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अंगीकृत रुग्णालयांनी रुग्णांची विनाविलंब नोंदणी करून कॅशलेस उपचार द्यावेत. अशा पॅकेजमध्ये शस्त्रक्रियातपासण्यायोग्य दर्जाचे प्रत्यारोपणऔषधेजेवण आणि एक वेळचा प्रवास खर्च यांचा समावेश असून कोणतेही शुल्क आकारता कामा नयेअसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

योजनेत समाविष्ट उपचार नाकारणे किंवा रुग्णांकडून रक्कम मागणे अशा तक्रारी आल्यास चौकशीनंतर संबंधित रुग्णालयावर दंडनिलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व नागरिक या एकत्रित योजनेतर्गत उपचारांसाठी पात्र आहेत. नागरिकांनी योजनांबाबत जागरूक राहून आपले हक्क बजावावेत आणि कोणत्याही अडचणीसाठी आरोग्यमित्रजिल्हास्तरीय अधिकारीजिल्हाधिकारी यांच्या समिती किंवा राज्य आरोग्य हमी सोसायटीशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष

 प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष (किऑस्क) स्थापन करणे बंधनकारक असून या कक्षात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उपचार व सुविधा मिळण्यात अडचण आल्यास तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयकक्षेत्रीय व्यवस्थापकअंमलबजावणी सहाय्य संस्था आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती प्रत्येक रुग्णालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितनागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — १५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५

 आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली

मुंबई, दि. ०५: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित करून जानेवारी २०२५ पासून महत्त्वपूर्ण सुधारणा लागू केल्या आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

रुग्णाना मिळणाऱ्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असून उपचारांच्या दरात वाढ तसेच पेमेंट प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. उपचारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी एनएबीएच आणि एनक्यूएएस प्रमाणित रुग्णालयांना दावा रक्कमेतून प्रति उपचार १० ते १५ टक्के प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती” तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली “जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी” गठीत करण्यात आली आहे. नागरिकांना योजनांविषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ तास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — १५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५

विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप

 कार्ल सॅबेले म्हणाले कीविक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आलेहा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे.

            राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.

            प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरेआश्विनी दाशरथेप्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

महाराष्ट्र थांबणार नाही

 महाराष्ट्र थांबणार नाही


            मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी विक्रमाची घोषणा केली. प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एआयआयएम बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Featured post

Lakshvedhi