आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम
-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 03 :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, अधिक सक्षम, तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला राज्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य, आरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment