प्रशिक्षण हा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी, चांगली वागणूक देण्यासाठी, कामकाजात गतिमानता, तांत्रिक कौशल्य येण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढण्यासाठी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक असल्याने, आरोग्य विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय प्रशिक्षण देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी एसईआरसीएच, पीएचएफआय, आयएमएमएएसटी, इनिशिएटिव्ह ऑफ चेंज, ताम्हिणी घाट पुणे या प्रशिक्षण संस्थांनी सादरीकरण केले. या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षणामुळे टेक्निकल स्किल, इथिकल व्हॅल्यू, टीम मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप मॅनेजमेंट, व कॉन्फिडन्स वाढल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा फायदा झाला असून, नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल असेही सांगितले.
रुग्णालयातील सर्वसाधारण व्यवस्थापन, रुग्णाला दिली जाणारी वागणूक, उपचारातील आधुनिक तांत्रिक कौशल्ये,कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह सर्व आधुनिक घटकांचा शिक्षणात समावेश असावा. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 'मास्टर ट्रेनर' बनून इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.
No comments:
Post a Comment