Thursday, 4 December 2025

ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

 ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या क्षमतेस चालना देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात निधी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महापारेषण (एमएसईटीसीएल), त्यानंतर महावितरण आणि महानिर्मिती या देशातील मोठ्या वीज कंपन्या सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रक्रियेसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनुभवाची मोठी मदत ठरेलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक महानगरपालिकेला खुल्या बाजारातील गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद

 नाशिक महानगरपालिकेला खुल्या बाजारातील गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेयापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनीही खुल्या वित्तीय बाजारातून बॉण्डद्वारे निधी उभारला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉण्ड'ला गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शनसाठी मिळालेला चौपट प्रतिसाद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक सक्षमतारेटिंग आणि पारदर्शक प्रक्रियेची पावती आहे. राज्यातील 15 महानगरपालिका अशा क्षमतेच्या असून नियमन प्रक्रियेतून विशिष्ट पात्रता आणि नियामक मान्यता पूर्ण करून या महानगरपालिकाही विकासासाठी निधी उभारू शकतात.        

खुल्या बाजारातून उभारलेल्या निधीच्या आधारे केंद्र सरकारकडून पायाभूत विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा मार्गही सुलभ झाला आहे.

तसेच ‘एनएसई’ प्रक्रियेमुळे 26 कोटी रुपये प्रोत्साहन निधी मिळणार असून याद्वारे महानगरपालिकेवरील व्याजभार शून्य टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतोअशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

 कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डनॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध

·         गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

 

मुंबईदि. 2 :- दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. विकास भीविरासत भी’ हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश मार्गदर्शक असून कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचेही जतन करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉण्डसमारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवालनगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराजनॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, 'मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीविभागीय आयुक्त प्रवीण गेडामकुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होते.

महाराष्ट्र 'राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

 महाराष्ट्र 'राजभवनझाले आता लोकभवन

 

मुंबई, दि. 2 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत.

 

राजभवन अधिक लोकाभिमुखपारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.   

 

लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राज भवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहताराज्यातील नागरिकसमाजातील विविध घटकविद्यार्थीसंशोधकशेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

 

'लोकभवनहे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवासहकार्य व संवादाचा सेतू व्हावेहीच या नामांतरामागची भूमिका आहेअसे त्यांनी सांगितले.

 

'लोकभवनकेवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहतासमाजाच्या आशाआकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.


महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास

 महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यात येईल.या फाऊंडेशनला क्लिनिकल ट्रायल्स मधून निधीची उभारणी करता येईलआशियाई विकास बैंकजपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीजागतिक बैंक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्याअनुदानेसीएसआर अंतर्गत देखील निधी शासनाच्या मान्यतेने मिळवता येवू शकेल.आवश्यकता भासल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीआशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनात्त प्राप्त होणा-या  कर्जातून विहित प्रक्रियेद्वारे निधी उपलब्ध करून घेता येईल.

0000

महाकेअर फाऊंडेशनला विविध माध्यमातून होणार उपलब्ध निधी

 महाकेअर फाऊंडेशनला विविध माध्यमातून होणार उपलब्ध निधी

    महाकेअर फाऊंडेशनला दैनंदिन भागभांडवल म्हणून सुरुवातीला १०० कोटी रूपये इतका निधी 'कॉर्पस फंडम्हणून राज्य शासनामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतर्गत दुर्धर आजारासाठी उभारण्यात येणाऱ्या २० टक्के राखीव निधीतून (Corpus fund) उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यात येईल.या फाऊंडेशनला क्लिनिकल ट्रायल्स मधून निधीची उभारणी करता येईलआशियाई विकास बैंकजपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीजागतिक बैंक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्याअनुदानेसीएसआर अंतर्गत देखील निधी शासनाच्या मान्यतेने मिळवता येवू शकेल.आवश्यकता भासल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीआशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनात्त प्राप्त होणा-या  कर्जातून विहित प्रक्रियेद्वारे निधी उपलब्ध करून घेता येईल

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाकेअर फाउंडेशनची स्थापना

 मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाकेअर फाउंडेशनची स्थापना

एल २ व एल ३ स्तरावरील आरोग्य संस्थांना आवश्यकतेनुत्तार मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेसंस्थांचे व्यवस्थापन करणेपीपीपी धोरण राबविणे तसेच इतर अनुषंगिक बाबी पार पाडणे इ. बाबींकरिता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायदा२०१३ मधील सेक्शन-८ अंतर्गत महाराष्ट्र कॅन्सर केअररिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन" महाकेअर फांउडेशन (MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल. त्रिस्तरीय कर्करोग सेवा देणा-या या संस्थाच्या योग्य समन्वयासाठी  सिंगल क्लाऊड कमांड आणि कंट्रोल असेल. एल 2 स्तर रुग्णालयामध्ये कर्करोगासंबधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण एमडीएएसडीएमएमसीएचडीएनबी फेलोशिप उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. रुग्णसंख्या व शैक्षणिक बाबी यांसाठी भविष्यातील मागणी विचारात घेता एल 2 स्तरावरील संस्थांचे रूपांतर एल 1 संस्थेत करणे तसेच भविष्यात या संस्थांच्या संख्येत वाढ देखील करण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi