मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाकेअर फाउंडेशनची स्थापना
एल २ व एल ३ स्तरावरील आरोग्य संस्थांना आवश्यकतेनुत्तार मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, संस्थांचे व्यवस्थापन करणे, पीपीपी धोरण राबविणे तसेच इतर अनुषंगिक बाबी पार पाडणे इ. बाबींकरिता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन-८ अंतर्गत महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन" महाकेअर फांउडेशन (MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल. त्रिस्तरीय कर्करोग सेवा देणा-या या संस्थाच्या योग्य समन्वयासाठी सिंगल क्लाऊड कमांड आणि कंट्रोल असेल. एल 2 स्तर रुग्णालयामध्ये कर्करोगासंबधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण एमडी, एएस, डीएम, एमसीएच, डीएनबी फेलोशिप उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. रुग्णसंख्या व शैक्षणिक बाबी यांसाठी भविष्यातील मागणी विचारात घेता एल 2 स्तरावरील संस्थांचे रूपांतर एल 1 संस्थेत करणे तसेच भविष्यात या संस्थांच्या संख्येत वाढ देखील करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment