Wednesday, 19 November 2025

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन

 छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन

-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

मुंबईदि. १८ : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि महत्वाच्या ठिकाणी शौचालयांची कमतरता लक्षात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

 

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात ‘पे अ‍ॅण्ड यूज’ १०० नवीन शौचालय उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस दूर दृश्यप्रणाली द्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांतमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदारसामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुखतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

            सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणालेछत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असूनवाढत्या लोकसंख्येला अनुरूप स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे. विशेषतः बाजारपेठाबसस्थानकेगर्दीच्या वसाहतीपर्यटनस्थळेसार्वजनिक रस्ते व प्रमुख चौकांमध्ये शौचालयांची कमतरता जाणवते. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उद्देश शहरी वसाहतींमध्ये स्वच्छता सुविधा निर्माण करणेसफाई कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि नागरी सुविधांची उपलब्धता वाढवणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील १०० लाभार्थ्यांना शौचालय बांधणीकरिता महानगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यक निधी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकासच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

ही शौचालये महिलापुरुष आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या सुविधा असलेलीपाण्याची उपलब्धताविद्युत व्यवस्थासुरक्षा व्यवस्था व नियमित साफसफाई यांसह प्री-फॅब्रिकेटेड/मॉड्यूलर तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

कृत्रिमरित्या फळे-पिकविण्यावर निर्बंध; नियमबाह्य पद्धतींवर कारवाई करण्यात येणार -

 कृत्रिमरित्या फळे-पिकविण्यावर निर्बंध;

 नियमबाह्य पद्धतींवर कारवाई करण्यात येणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

 

मुंबईदि१८ :- कृत्रिमरित्या फळे व भाज्या पिकविण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर होऊ नये यासाठी तपासणी करण्यात यावी तसेच अवैध प्रकारांवर कारवाई करावीअसे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

      यासंदर्भात सहकार व पणन विभागाच्या अखत्यारीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या फळ व्यापाऱ्यांना फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी दिले.

 

      मंत्रालयात सहकारपणन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे-पाटीलसहसचिव रा. को. धनावडेसहआयुक्त मंगेश मानेतसेच सहकार व पणन विभागाच्या उपसचिव माधवी शिंदे उपस्थित होत्या.

 

बेकायदेशीर रसायने किंवा गॅस वापरून फळे कृत्रिमरीत्या पिकविण्याचे प्रकार आढळल्यास अन्न सुरक्षा मानके कायदा (एफएसएसएआयअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान आंबाकेळी आणि इतर फळांचे एकूण १२८ नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १०४ नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत. २४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, बैठकीत विभागाकडून अशी माहिती देण्यात आली,

अन्न सुरक्षा मानके नियम २०११ मधील नियमन 2.3.5 नुसार फळे कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कार्बाईड गॅसचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. ऑगस्ट २०१६ मधील दुरुस्तीनुसार १०० पीपीएम तीव्रतेपर्यंत इथिलिन गॅसचा वापर करण्यास मर्यादित परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी विभागाचे सहायक आयुक्त महालेकक्ष अधिकारी अजित जगताप उपस्थित होते.

प्रतिबंधित पदार्थ वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई

 प्रतिबंधित पदार्थ वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

·         उपहारगृह व हॉटेलच्या ठिकाणी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी अभियान

 

         मुंबईदि. १८ : आरोग्याला घातक असलेल्या प्रतिबंधित पदार्थांचा वापर आणि अशा पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सतर्क रहावेतसेच असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

        मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी आयुक्त श्रीधर डुबे पाटीलसहआयुक्त (दक्षता) डॉ.राहुल खाडेसहआयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते.

        अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेप्रतिबंधित असलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांची विक्री शाळा अथवा कोणत्याही परिसरात होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने वेळोवेळी काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी यासंदर्भात अक्षम ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ म्हणाले.

         नागरिकांना स्वच्छ आणि सकस आहार मिळावा तसेच उपहारगृह व हॉटेलच्या ठिकाणी अधिक चांगले वातावरण राहावे. या दृष्टीने लवकरच राज्यात अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये चांगले काम करणाऱ्यांना गौरवण्यात येईल. यासाठी शहरांसह ग्रामीण भागात तालुकास्तरावर देखील नियोजन केले जावे. या दृष्टीने विभागाने कार्यवाही करावीअसे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.

मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल असून ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर या उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सर्व रस्त्यांचे रिसरफेसिंग करावे. ज्याठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे अशा ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्यावरील ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ४२ उड्डाणपुलांची देखील तातडीने दुरूस्ती हाती घ्यावी, असे सांगतानाच अटलसेतूचे देखील रिसरफेसिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ००००

  

 महापालिकाएमएमआरडीएएमएसआरडीसीएमईपीमहारेल यांना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·        दुरुस्ती कामाच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष उभारणार

 


मुंबईत एमएसआरडीएकडे पाच आणि एमईपी कडे १९ असे एकूण २४ उड्डाणपुल असून ते मुंबई महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर या उड्डाणपुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावीअसे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सर्व रस्त्यांचे रिसरफेसिंग करावे. ज्याठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे अशा ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्यावरील ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

 

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ४२ उड्डाणपुलांची देखील तातडीने दुरूस्ती हाती घ्यावीअसे सांगतानाच अटलसेतूचे देखील रिसरफेसिंग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

००००


२२ आणि २३ नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार वन आहार महोत्सव

 २२ आणि २३ नोव्हेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार वन आहार महोत्सव

 

आदिवासींची लोप पावत चाललेली समृद्ध संस्कृती जतन करण्यासाठी वन आहार महोत्सवाचे आयोजन

 

मुंबईपुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोकत्यांची संस्कृतीत्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतुहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळतेतेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५





ला ! स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत वन आहार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पावरा समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार आहे. पोष फाऊंडेशनच्या अमोघ सहजे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पंचमहाभूते फाऊंडेशनदादर सांस्कृतिक मंच या संस्थांचे या महोत्सवास सहकार्य आहे.

 

 

या वन आहार महोत्सवात पावरा आदिवासींच्या विलक्षण आणि अतिशय रुचकर पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. त्या भागांत आढळणाऱ्या रानफुलांचा चहाज्याला 'डोमखाम्हणाताततसेच याच फुलांपासून बनवला गेलेला एक जॅमचविष्ट रानभाज्यादक्षिण भारतीय डोशाशी साधर्म्य असलेला हिता हा प्रकारत्यांच्या भाकऱ्या असे विविध पदार्थ या महोत्सवात चाखायला मिळणार आहेत. याशिवाय अगदी ज्युरॅसिक पार्कमधील वाटावेअसे लाथाडो हे फळविविध कंदमुळेकणसं यांचाही आस्वाद घेता येणार आहे.

 

विलक्षण पावरा संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न

 

नंदुरबारमधील नर्मदा खोऱ्यात राहणाऱ्या पावरा आदिवासी समाजाची संस्कृती विलक्षण आहे. नंदुरबारमधील अतिशय दुर्गमडोंगराळ भागांत आदिवासी रहातात. या गावांमध्ये कुठल्याही सोयी - सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षणाच्याही सोयी अपुऱ्याच आहेत. सातत्याने निसर्गाच्या प्रतिकूलतेशी झगडावे लागत असल्याने हे सर्वच लोक अतिशय काटकमजबूत शरीराचे असतात. यांच्यात इतकी कौशल्ये दडली आहेत कीपोहणेगिर्यारोहणतिरंदाजी यांसारख्या खेळांत ते कसलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देखील मागे टाकतील. यांची भाषात्यांची वेशभूषात्यांचे आचार - विचारत्यांच्या लोककथा या सर्वच एक विलक्षण अनुभव देणाऱ्या आहेत. काळाच्या रेट्यामुळे या सर्वच गोष्टी किती टिकतील हा प्रश्नच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वन आहार महोत्सवाच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 

पोष फाऊंडेशनचा पुढाकार

 

आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमोघ सहजे पोष फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या आक्रमणाच्या काळात ही संस्कृती जपण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून हा वनआहार महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जो निधी उभा रहाणार आहेत्यातून आदिवासी समुदायाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेतअसे अमोघ सहजे म्हणाले.

 

'वन आहारमहोत्सवाला भेट द्या - मंजिरी मराठे यांचे आवाहन

 

''नंदुरबार जिल्यातील पावरा आदिवासी बांधव सुदृढ असण्याचं कारण म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती. या आपल्या बांधवांच्या संस्कृतीचे संवर्धन झालं नाहीतर त्यांची खाद्यवाद्यसंगीत संस्कृतीत्यांची कलाभाषा लोप पावेल. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या 'वन आहारमहोत्सवाला भेट द्याया उपक्रमाचा भाग व्हा'', असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.



ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत

 ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना

एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

·         ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ

 

मुंबईदि. १८ : ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

केंद्र शासनराज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम.बी.एस.यू.पी. योजना शहरी गरिबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्टयांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यू.पी. सदनिकांमध्ये केले जाते.

 

हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरिता प्रत्येकी ५६ हजार ते १ लाख ३४ हजार इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरीबांकरिता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटूंबांना होणार आहे

००००


 

 

वृत्त 

नवीन सेतू सुविधा केंद्रे डिजिटल क्यू मॅनेजमेंट

 नवीन सेतू सुविधा केंद्रे डिजिटल क्यू मॅनेजमेंटटोकन प्रणालीरियल-टाइम स्टेटस डिस्प्ले आणि आरामदायक वेटिंग एरिया अशा अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असूननागरिकांचा वेळ वाचवणे आणि सेवा प्रक्रिया सुलभ करणे हे या केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतचजिल्ह्यात फिरते सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असूनत्याद्वारे नागरिकांना घराजवळ किंवा घरपोच सेवा अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना सेतू कार्यालयात एकदाच अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर पुन्हा दाखला घेण्यासाठी येण्याची गरज पडू नयेनागरिकांचा वेळ वाचावा आणि घरबसल्या व्हॉटस्ॲप वर दाखला मिळावा यासाठी आपले सरकार आपला दाखला थेट आपल्या हातात’ असा व्हॉटस्ॲप सर्विस डिलिव्हरी उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेवांविषयीची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी व्हॉटस्ॲप चॅटबॉट सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून 238 नवीन आपले सरकार सेवा केंद्रही कार्यान्वित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.


Featured post

Lakshvedhi