Saturday, 15 November 2025

राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

 राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

संचार साथी पोर्टलद्वारे परदेशी क्रमांक भारतीय (+91) क्रमांक म्हणून दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. अशा तक्रारींवर दूरसंचार विभाग आणि पोलिस यांच्यातील समन्वयातून तातडीने तपास व कारवाई करण्यात येते आणि संबंधित फसवणूक नेटवर्क निष्क्रिय केले जातात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळते.

नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक 1963 वर माहिती द्यावी.

मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

 मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (Invoice) सुरक्षित ठेवावेकारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा IMEI क्रमांक नमूद केलेला असतो.

जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतीलतर त्या उपकरणास दोन वेगवेगळे IMEI क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#06# हा कोड डायल करून आपले IMEI क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेलजीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.

संचार साथीच्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतोतसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ शकतात.

मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

 मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (Invoice) सुरक्षित ठेवावेकारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा IMEI क्रमांक नमूद केलेला असतो.

जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतीलतर त्या उपकरणास दोन वेगवेगळे IMEI क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#06# हा कोड डायल करून आपले IMEI क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेलजीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.

संचार साथीच्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतोतसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ

पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा

 पोर्टल आणि अ‍ॅपवरील प्रमुख सुविधा


संचार साथी पोर्टलवर “Know Your Mobile Connections”, “Block Your Lost/Stolen Mobile” आणि “Verify IMEI” या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत. या सेवांद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती तपासणे - म्हणजेच त्यांच्या नावावर एकाच ओळखीसह किती कनेक्शन आहेत हे पाहणे, हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस IMEI ब्लॉक करणे, तसेच IMEI क्रमांक आणि डिव्हाइसची प्रामाणिकता पडताळणी करणे शक्य होते.

या सुविधांमुळे मोबाईल ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षिततेस मोठा हातभार लागला आहे. याशिवाय “चक्षु” या विशेष सेवेच्या माध्यमातून संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश यांची नोंद नागरिक करू शकतात. त्यामुळे फसवणूक, सायबर गुन्हे, बनावट ओळख निर्माण करणे तसेच अवांछित व्यावसायिक संदेशांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे

दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षितता व जनसहभागाकडे

 दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकतासुरक्षितता व जनसहभागाकडे  : संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप

मुंबईदि. 8: भारतातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्याविशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) संचार साथी हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रणफसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक (डीडीजी) सुमनेश जोशी यांनी  महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील अनावश्यक अ‍ॅप्स तत्काळ काढून टाकावेत आणि फोन नेहमीच नवीनतम सुरक्षा ॲपसह अपडेट ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनी दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित संचार साथी’ हे अ‍ॅप डाउनलोड करून त्यातील सर्व उपयुक्त वैशिष्ट्यांचा वापर करावा.

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री

 एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

·         दैनंदिन बैठकाउद्दिष्टनिश्चितीनव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प

 

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढकार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करतसुधारणा, वेग’ आणि नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुखप्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.

कुष्ठरोग निवारण हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन

 हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करूनकुष्ठरोग निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. घरोघर तपासणी करून समाजातीलनिदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करणेकुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे२०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणेही या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर सर्वेक्षणाविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या आणि प्रा.आ. केंद्रांवर पथक सदस्यांचे प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे.

राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज’ म्हणून घोषित केले आहे.

यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालयसहाय्यक संचालकआरोग्य सेवाकुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.

००००

Featured post

Lakshvedhi