Friday, 14 November 2025

कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल-

 कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेसिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल. कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे

 सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे.  प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुर्नजागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली. याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर जागा असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ५०० एकर जागा आहे. अत्यंत कमी जागा असूनही २०१५ मध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील असे आयोजन व्हावे यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी

 कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे. नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतरेल्वे सुविधाबस स्थानकाची सुविधास्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहीत करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. भविष्यातही कुंभच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न आहे.  कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.  विकासकामे करतांना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाहीतथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे. साधूसंतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावेत्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहेअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

कुंभमेळ्यासाठी रस्ते, महामार्ग दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य

 मुख्यमंत्री पुढे म्हणालेकुंभमेळ्यासाठी रस्तेमहामार्ग दुरूस्तीपिण्याच्या पाण्याची योजनागोदावरीचे पावित्र्य राखणेचांगल्या घाटांची निर्मितीजुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवनविकासकामे करतांना गोदाघाटाचे पुरातन रुप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे. नाशिक हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील २५ वर्ष टिकली पाहिजे आणि नाशिक पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे रुप बदलेल आणि शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन

 मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेयावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्थासुरक्षापर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मुळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामतून २० हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील. शासनाच्या  सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरूवात होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहेअसे त्यांनी सांगितले.

Thursday, 13 November 2025

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम -

 पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

-         कौशल्य, रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

 

मुंबईदि १३ : जगभरात आता विविध क्षेत्रात एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. एआय’ तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ ही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य, रोजगारउद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

         रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात एआय’ तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकरएआय तज्ज्ञ किशोर जस्नानी,उपकुलसचिव राजेंद्र तलवारेमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेसरचिटणीस दिपक भातोसे तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार यावेळी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.

मंत्रालय आणि विधिमंडळ संघाच्या सदस्य पत्रकारांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्याधिक आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र या तंत्रज्ञानाने अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणे काम करता येईल, असे कौशल्य मंत्री

       मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दिपक भातोसे यांनी कौशल्य,रोजगारउद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असून या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची वैशिष्ट्य

 नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची वैशिष्ट्य

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेली नाशिक जिल्हा परिषदेची नूतन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. शाश्वत विकासऊर्जा बचतसुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे.

ऊर्जासक्षम बांधकामपुरेसा नैसर्गिक प्रकाश व खेळती हवातसेच छतावर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे.

इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययनसंशोधन आणि संदर्भासाठी सुविधा आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रसुरक्षित व आरामदायी विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहेत.

Featured post

Lakshvedhi