Tuesday, 11 November 2025

आपले सरकार सेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे

 मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले कीआपले सरकार सेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे प्रमाणपत्र पाठविणेअर्ज प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे सर्व आपले सरकार’ तसेच आधार केंद्रांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळच्या सेवा केंद्राचे ठिकाण गुगल मॅप व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे सहजपणे कळू शकते.

जिल्हाधिकारी श्री.कटियार म्हणाले कीतहसील कार्यालयातील सेतू केंद्रांचे आधुनिकिकरण सुरू असूनजशी सुविधा पासपोर्ट कार्यालयात मिळते तशीच सुविधा नागरिकांना सेतू कार्यालयात मिळणार आहे. अंधेरी तालुक्यात प्रभागनिहाय 54, बोरीवली तालुक्यात प्रभागनिहाय 67 व कुर्ला तालुक्यात प्रभागनिहाय 117 आपले सरकार सेवा केंद्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी (संगांयो), राजेंद्र पाटोळे, उपविभागीय अधिकारी, प्रशांत ढगे, तहसीलदार, राजेंद्र चव्हाण, तहसीलदार अंधेरी, स्नेहलता स्वामी उपस्थित होते, तहसीलदार, राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र’ आणि दिलखुलास’ कार्यक्रमात

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

मुंबईदि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनवरील जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजतातसेच आकाशवाणीवरील दिलखुलास’ कार्यक्रमात 121314 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली असून, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. दिलखुलास’ कार्यक्रमातील मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईलतसेच  ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्थांचा निवडणुक कार्यक्रम घोषित झाला आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त, वाघमारे यांच्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत समाजमाध्यम हँडल्स्‌

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube:https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा - सुविधा तयार करा

 भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा - सुविधा तयार करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १० : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेवून श्री क्षेत्र भीमाशंकरश्री क्षेत्र औंढा नागनाथ  व  श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक  विकास आराखडा असावा. मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा. या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश  सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

           वर्षा निवासस्थान येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरहिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ  व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला   मुख्य सचिव राजेश कुमारमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व्ही.राधा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, .नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ताउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र’ आणि दिलखुलास’ कार्यक्रमात

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

मुंबईदि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनवरील जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजतातसेच आकाशवाणीवरील दिलखुलास’ कार्यक्रमात 121314 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली असून, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. दिलखुलास’ कार्यक्रमातील मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईलतसेच  ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्थांचा निवडणुक कार्यक्रम घोषित झाला आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त, वाघमारे यांच्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत समाजमाध्यम हँडल्स्‌

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube:https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

0000

श्री गुरु तेग बहादुर - हिंद दी चादर

 श्री गुरु तेग बहादुर - हिंद दी चादर

श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 -  नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते.  त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्यायधार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर’ या नावाने गौरविले जात. धर्ममानवताआदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त  महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

एप्रिल १६२१ मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरू हरगोबिंद आणि माता गुजरी यांच्या कुटुंबात झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांतध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्यसंपत्तीमान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदणी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करतईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले.

Monday, 10 November 2025

ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी. अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा, जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत. आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल. पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणा-या सध्याची भाविकांची

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणा-या सध्याची भाविकांची व भविष्यातील संख्येनुसार दर्शन रांगांचे नियोजनयात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेऊन मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोयनिवासाची व्यवस्थाअंतर्गत रस्तेपरिसर साफसफाई करणेमाहिती फलकपर्यटक स्वागत कक्षपाकिंग व्यवस्थापनआपत्कालीन यंत्रणातिकीट कक्षआरोग्य सुविधाउपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवा. स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेऊन येथील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi