Thursday, 9 October 2025

भारत आणि युके यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट

 भारत आणि युके यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट

भारत आणि युके यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट होत असूनदोन्ही देश संयुक्त उत्पादनाच्या दिशेने पावले टाकत आहेत. याशिवायदोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये सैन्य प्रशिक्षण सहकार्य करार झालेला असूनत्याअंतर्गत भारतीय वायुसेनेचे उड्डाण प्रशिक्षक आता युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. मुंबईत बैठक चालू असतानाआपल्या नौदलांची जहाजे कोंकण 2025’ हा संयुक्त सराव करत आहेत. हा आमच्या मजबूत सामरिक सहकार्याचा पुरावा असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.

युकेमध्ये वास्तव्यास असलेले 18 लाख भारतीय हे दोन्ही देशांमधील मैत्रीचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी ब्रिटिश समाज आणि अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून दोन्ही देशांतील मैत्री आणि विकासाच्या पुलाला बळकटी दिली आहेअसेही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारताची गतिशीलता आणि युकेची तज्ञता मिळून एक अद्वितीय सुसंवाद निर्माण होतो. आमची भागीदारी प्रतिभातंत्रज्ञान आणि विश्वासावर उभी आहे. आम्ही दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल भविष्य घडवूअसा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना

 भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना

तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अमर्याद सहकार्याची क्षमता असल्याचे सांगत प्रधानमंत्री मोदी म्हणालेआम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता आणि संशोधन क्षमता भारताच्या प्रतिभा व व्याप्तीशी जोडत आहोत. गेल्या वर्षी सुरू केलेल्या भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना मिळत आहे. खनिज क्षेत्रातील सहयोगासाठी नवीन उद्योग संघ स्थापन केला जात असून त्याचा सॅटेलाईट कँपस आयएसएम धनबाद येथे असणार आहेअशी माहितीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिली. शाश्वत विकासासाठी दोन्ही देशांनी भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्स आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधी स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी म्हणालेब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत. साऊदम्टन विद्यापीठाच्या गुरूग्राम कॅम्पसचे उद्घाटन झाले असूनगिफ्ट सिटीमध्ये आणखी तीन विद्यापीठांच्या शाखा उभारल्या जात आहेत.

भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना

 भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना

तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अमर्याद सहकार्याची क्षमता असल्याचे सांगत प्रधानमंत्री मोदी म्हणालेआम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता आणि संशोधन क्षमता भारताच्या प्रतिभा व व्याप्तीशी जोडत आहोत. गेल्या वर्षी सुरू केलेल्या भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना मिळत आहे. खनिज क्षेत्रातील सहयोगासाठी नवीन उद्योग संघ स्थापन केला जात असून त्याचा सॅटेलाईट कँपस आयएसएम धनबाद येथे असणार आहेअशी माहितीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिली. शाश्वत विकासासाठी दोन्ही देशांनी भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्स आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधी स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी म्हणालेब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत. साऊदम्टन विद्यापीठाच्या गुरूग्राम कॅम्पसचे उद्घाटन झाले असूनगिफ्ट सिटीमध्ये आणखी तीन विद्यापीठांच्या शाखा उभारल्या जात आहेत.

ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (CETA) सहमती

 प्रधानमंत्री मोदी म्हणालेयावर्षी जुलै महिन्यात माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (CETA) सहमती दर्शविली. या करारामुळे व्यापार आणि रोजगार निर्मिती वाढेल आणि ग्राहक तसेच उद्योग क्षेत्र दोघांनाही लाभ मिळेल. ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ ही भागीदारीतील नव्या ऊर्जेचे द्योतक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींची शिखर परिषदसीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री मोदी म्हणालेआजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक आणि पश्चिम आशियातील स्थैर्यतसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण झाली. युक्रेन आणि गाझाच्या मुद्द्यावर भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता पुनप्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नाचे समर्थन करतो. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

 भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

·         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन

·         व्यापारतंत्रज्ञानशिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी

 

मुंबईदि.९ : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाहीस्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळातभारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असूनव्यापारतंत्रज्ञानशिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील राजभवन येथे आज त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर नरेंद्र मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी बोलत होते.

महिलांच्या मुलांशी गळा र्भेटीच्या उपक्रमांबद्दल, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या समुपदेशन आणि कायदेविषयक मदतीबद्दल मा

 जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी महिलांच्या मुलांशी गळा र्भेटीच्या उपक्रमांबद्दलसामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या समुपदेशन आणि कायदेविषयक मदतीबद्दल माहिती दिली.

उपायुक्त सुवर्णा पवार यांनी महिलांना सुधारगृहात दिल्या जाणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाबाबत सांगितले. या प्रशिक्षणातून मिळणारी रक्कम महिलांना सुधारगृहातून बाहेर पडताना दिली जातेज्यामुळे त्यांचे पुनर्वसन सुलभ होते.

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी महिला व बालकांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधाखाटाआयसीयूसोनोग्राफीतसेच स्वस्थ नारी सशक्त परिवार योजनेबाबत माहिती दिली.

दौऱ्यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक योगेश देसाईअधीक्षक विकास राजनळवारजेलर अमृता यशवंतेसंतोषी कोळेकरपौर्णिमा सोनवणेकल्पना खंबाईतजिल्हा बालसंरक्षक  मीरा गुडिलेअधिक्षीका निशिगंधा भवलतसेच आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाडडॉ. वैशाली चंदनशिवे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

महिला कारागृहाला भेट देऊन तेथील महिला बंदिवानांशी

 समिती सदस्यांनी महिला कारागृहाला भेट देऊन तेथील महिला बंदिवानांशी संवाद साधला. त्यांच्या आरोग्यआहारपाणीपुरवठाग्रंथालयकौशल्य प्रशिक्षण आणि मुलांसाठी असलेल्या अंगणवाडीबाबत माहिती घेतली. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईलअसा विश्वास समिती सदस्यांनी दिला. शताब्दी रुग्णालय आणि शहाजी रुग्णालय येथे समितीने महिला व बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.

 मातृवंदना योजनालक्ष्य योजनाऔषधसाठास्वच्छतासुरक्षासीसीटीव्ही व्यवस्था याची पाहणी केली. बालसुधारगृह व महिला सुधारगृह (मानखुर्द) येथे महिलांच्या मानसिक आरोग्यशिक्षणसमुपदेशन आणि पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

समिती प्रमुख मोनिका राजळे म्हणाल्या कीमहिला व बालकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधाआधुनिक यंत्रसामग्री आणि सुरक्षित निवास उपलब्ध व्हावा यासाठी शासनाला ठोस शिफारसी करण्यात येतील. समस्याग्रस्त आणि गरजू महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती सर्वोतोपरी सहकार्य करेल.

या दौऱ्याद्वारे समितीने महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. आगामी काळात त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाला योग्य त्या शिफारसी करण्यात येणार आहेत.

Featured post

Lakshvedhi