Tuesday, 7 October 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा

 

मुंबईदि. ७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलदादर येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी आनंदराज आंबेडकरसामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणालेसमुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक साकारत आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्याबाबत संबंधित विभागास अवगत करण्यात आले आहे. पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुतळा विहित वेळेत उभा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 

मुंबईदि. ०१ : सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार,  शिक्षक,  वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात. त्यांच्या अंगी असलेली अपार क्षमता योग्य उपचारशिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आलीतर ही मुले केवळ चालूच शकतात असे नाहीतर जगालाही दिशा देऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्वासामुळे या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमाने अनेक घरांमध्ये आशेचा नवा दीप प्रज्वलित केला आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेली दहा वर्षं सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करत आहेत. त्यांनी केवळ साहित्य पुरवले नाहीतर वैद्यकीय उपचारांपासून ते भावनिक आधारापर्यंत या मुलांना व त्यांच्या पालकांना सर्वंकष साथ दिली आहे. या कार्यासाठी त्यांना BT-CSR एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

या फाउंडेशनने आजवर एक हजाराहून अधिक आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून आवश्यक त्या विशेष सेवा गरज असलेल्या मुलांपर्यंत पोहोचवली आहे. अनेक मुले जी आतापर्यंत चार भिंतींत अडकून पडली होतीत्यांना आता घरबसल्या उपचार व सुश्रुषा मिळत आहेत.

सातारावाईपाचगणीपाटणतळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपीस्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा आज शेकडो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कीहा फक्त उपक्रम नाही तर समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे ही व्यक्तिगत स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना एकटे नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे.

0000

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी

 पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी :-

नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्गलांबी २०४ किलोमीटरचंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटरभूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.

नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्गभूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्गलांबी ९४ किलोमीटरअंदाजित रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू.

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' निर्माण करा

 नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता

भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीमनिर्माण करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १ : नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची इकोसिस्टीमनिर्माण करण्यात यावी. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेविकासाचे प्रकल्प पूर्ण करताना कालमर्यादेचे बंधन असावे. प्रकल्प रेंगाळला किंवा विलंब झाल्यास किंमत वाढीमुळे विनाकारण राज्यावर आर्थिक भुर्दंड बसत असतो. सध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी - सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीची गती कुठेही कमी पडू देऊ नये. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियोजनबद्ध विहित कालमर्यादेत पूर्ण करावी.

राज्यामध्ये यापुढे पायाभूत सुविधांची कामे घेताना ती आधी गतिशक्ती पोर्टलवर आणावी. गतिशक्ती पोर्टलवर घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नये. यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसिंचन प्रकल्पांची कामे घेतानाही भविष्यात येणाऱ्या अडचणी बघून सुरुवातीपासूनच नियोजन करावे. या प्रकल्पांचे भूसंपादन आधीच करून नंतर कामाला सुरुवात करावी.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनाकरिता विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी बाह्य स्त्रोतांद्वारे संबंधित क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ घ्यावे. पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांना दिलेल्या आयडीमुळे देयकातील अनियमिततेवर निर्बंध येतीलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने जुनी देयके अदा करण्यासाठी दायित्वानुसार कालबद्ध कार्यक्रम राबवावा. विभागांनी झालेल्या कामांचीच देयके अदा होतीलयासाठी आणि देयकांच्या तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रणा विकसित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण pl share

 सुधारित :

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण

– मंत्री मंगलप्रभात लोढा

·         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय

·         उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान

 

मुंबईदि. ६ : कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहेअशी माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यभरात ६०० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असूनया कार्यक्रमांना विश्‍वकर्मा समाजातील कारागीरस्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. या माध्यमातून त्यांच्या योगदानाला सन्मान मिळेल आणि समाजातील पारंपरिक कौशल्यांविषयी आदरभाव वाढेल.

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असूनपुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प विभागाने केला आहे. या उपक्रमाद्वारे कौशल्य शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यात येत असूनअभ्यासक्रमांची निवड स्थानिक मागणी व जनहिताच्या आवश्यकतेनुसार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संस्था व्यवस्थापन समित्या स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजनअंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे.

मंत्री लोढा म्हणाले कीउद्योगांच्या बदलत्या मागणीनुसार राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. ग्रामीण भागातील युवक तसेच महिला उमेदवारांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता

या कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असूनइच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रशिक्षण शुल्क प्रति महिना रुपये एक हजार ते ५ हजार इतके निश्चित करण्यात आले आहे. २५ टक्के जागा संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असूनउर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी खुल्या असतील. या अभ्यासक्रमांसाठी आयटीआयमधील विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच दहावीबारावीपदविका किंवा पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पात्र असतील.

उदयोन्मुख क्षेत्रांतील प्रशिक्षण

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असूनत्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगड्रोन तंत्रज्ञानइलेक्ट्रिक वाहनसोलर ऊर्जासायबर सुरक्षाइंटरनेट ऑफ थिंग्जआर्टिफिशियल इंटेलिजन्सग्रीन हायड्रोजनमोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञसोशल मीडिया इन्फ्लुएंसर इत्यादी विषयांचा समावेश आहे.

महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोलीलातूरनागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असूननाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.

मंत्री लोढा म्हणालेकौशल्य प्रशिक्षण हे केवळ रोजगार प्राप्तीचे साधन नाहीतर आत्मनिर्भरतेकडे नेणारी परिवर्तन प्रक्रिया आहे. अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कौशल्य क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल.

अधिक माहितीसाठी :

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य

नोंदणी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in

जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

कृषी विभाग व एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यामधील सामंजस्य करार

 कृषी विभाग व  एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन यांच्यामधील सामंजस्य करार

•        वातावरणीय बदल व पोषण मूल्यांचा विचार करता पारंपरिक व स्थानिक अशा भरड धान्यांच्या उत्पादन व प्रक्रिया शेती उद्योगांना प्रोत्साहन देणे.

•        संयुक्त राष्ट्राने २०२६ हे महिला शेतकरी वर्ष घोषित केलेले आहे. त्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याची निर्मिती. तसेच सावित्रीबाई फुले महिला शेतकरी सशक्तीकरण अभियानाची निर्मिती.

•        पर्यावरणपूरकपोषकजैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये बायोहॅपिनेस केंद्रांची निर्मिती.

टाटा मोटर्स फाऊंडेशन व ग्रामविकास विभाग यांच्यामधील सामंजस्य करार

 * पालघर जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये राबवविलेल्या एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यभरातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये (१०० गावे) हा कार्यक्रम राबवविला जाणार.

 * शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास पूरक असा हा कार्यक्रम आहे. राज्यातील १० आकांक्षित तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाईल.

 * निवडलेल्या प्रत्येक गावात तीन वर्षांच्या कार्यक्रम कालावधीत ग्रामपंचायत व स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणातून गावांचा शाश्वत विकास साधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रम कालावधीच्या अखेरीस संबंधित गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवा व योजनांचा १०० टक्के लाभ मिळालेला असेल.

 * विविध शासकीय योजना व कार्यक्रमांच्या तसेच टाटा मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अभिसरणातून हा कार्यक्रम राबवविला जाईल. शासकीय कार्यक्रमांच्या परिणामकारकतेत वाढ  करण्यासाठी प्रामुख्याने सामाजिक उत्तरदायित्व निधी उपयोगात आणला जाईल.

 * ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी व आराखड्याच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

०००००

उदयोन्मुख क्षेत्रांतील प्रशिक्षणhttps://admission.dvet.gov.in जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा.

 उदयोन्मुख क्षेत्रांतील प्रशिक्षण

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असूनत्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगड्रोन तंत्रज्ञानइलेक्ट्रिक वाहनसोलर ऊर्जासायबर सुरक्षाइंटरनेट ऑफ थिंग्जआर्टिफिशियल इंटेलिजन्सग्रीन हायड्रोजनमोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञसोशल मीडिया इन्फ्लुएंसर इत्यादी विषयांचा समावेश आहे.

महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोलीलातूरनागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असूननाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.

मंत्री लोढा म्हणालेकौशल्य प्रशिक्षण हे केवळ रोजगार प्राप्तीचे साधन नाहीतर आत्मनिर्भरतेकडे नेणारी परिवर्तन प्रक्रिया आहे. अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कौशल्य क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल.

अधिक माहितीसाठी :

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य

नोंदणी संकेतस्थळ : https://admission.dvet.gov.in

जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा.

0000

Featured post

Lakshvedhi