Monday, 6 October 2025

सेवानिवृत्त शिक्षकांचा सामाजिक सहभाग

 सेवानिवृत्त शिक्षकांचा सामाजिक सहभाग

अल्पमुदतीचे हे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तंत्रनिकेतनांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. हे शिक्षक आपले अनुभवज्ञान आणि तांत्रिक कौशल्य समाजासाठी वापरणार असूनसामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून शासनाच्या या उपक्रमात योगदान देतील. यामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.

प्रशिक्षणासोबत स्थानिकांचा सहभाग

 प्रशिक्षणासोबत स्थानिकांचा सहभाग

या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाच्या उद्घाटनादिवशी प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर स्थानिक दोन हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रशिक्षणार्थ्यांसोबत स्थानिक युवकपालक आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग सुनिश्चित करून या कार्यक्रमाला जनसहभागाचे रूप देण्यात येत आहे.

जनतेच्या सूचनांनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम pl share

 जनतेच्या सूचनांनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

या योजनेत जनतेलाही सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले गेले आहे. नागरिक आपल्या परिसरात कोणते रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू व्हावेत हे सुचवू शकतात आणि शासन त्यांच्या सूचनांचा अभ्यास करून त्या अभ्यासक्रमांचा देखील समावेश या योजनेत करणार आहे. यामुळे स्थानिक रोजगाराच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यास मदत होईल.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश

 प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असूनइच्छुक उमेदवारांना गावात किंवा शहरात जवळच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेता येईल.

अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ! औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्य आणि उद्योजकता केंद्र म्हणून विकसित होणार

 अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम !

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिक तंत्रज्ञाननाविन्य आणि

उद्योजकता केंद्र म्हणून विकसित होणार

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग सज्ज आहे. कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासात मोठे योगदान देत असते. सर्वांना व्यावहारिक आणि दर्जेदार शिक्षण देणेदेशातील उद्योग तसेच आवश्यक त्या क्षेत्राला अनुसरून गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रणाली विकसित करणेयुवक-युवतींचे विकसित माहिती तंत्रज्ञानासह ज्ञान अद्ययावत करणे, काळाच्या मागणीनुसार शिक्षण धोरण तयार करणेकेंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागातंर्गत येणाऱ्या सर्व योजना तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकासाच्या योजना राज्य शासन प्रभावीपणे राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे.                       

राज्यात कौशल्य विकासाच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात आहेत. राज्यातील युवक, युवतींना अधिकाधिक चांगल्या प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त व्हावा यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचा पदभार घेतल्यापासून विविध  निर्णय व योजना राज्यात सुरू करण्यात आल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राला देशाचे कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणे ध्येय आहे. आयटीआय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित  करून औद्योगिक आस्थापनांच्या सहयोगाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वाढविणे, प्रतिवर्षी पाच लाख युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक पारंपारिक कौशल्य आधारित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणे, यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २,५०६ तुकड्यांच्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन लवकरच ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम

 अण्णासाहेब पाटील  आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी

उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम

 

मुंबई, दि. ६ :  आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळने आता बँक कर्जावरील व्याज परतावा (Interest Reimbursement) योजना लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मार्गदशन देण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

       महामंडळाकडून विविध जिल्ह्यांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस मदत  होणार आहे. हा उपक्रम  तरुण उद्योजकांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

या उपक्रमातंर्गत महामंडळाच्या वतीने नुकतेच "पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय" या विषयावर उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. त्यात  राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले.  

डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला. उत्तम जातीच्या जनावरांची निवड, जनावरांचा आहारत्यांच्या आरोग्याची काळजी, जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. वेळोवेळी लसीकरण करणेतसेच आर्थिक नियोजनः दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलशासनाच्या विविध योजनातसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापन सोपे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख  याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

       राज्यभरातून अनेक युवकमहिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते. वेबीनारमधील सविस्तर माहिती महामंडळाच्या @AnnasahebPatilAMUM या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे.

000000

झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशन आणि इंडिया गोल्ड मेटाव्हर्सदरम्यान यावेळी सामंजस्य करार

 झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशन आणि इंडिया गोल्ड मेटाव्हर्सदरम्यान यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार व्यापारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या कराराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. झवेरी बाजाराला प्रदर्शनाच्या रूपात साकारण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून संपूर्ण परिसरच एका प्रदर्शन क्षेत्रात रूपांतरित झाला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमात पारंपरिक सांस्कृतिक वारसापरंपरा आणि आधुनिक सजावटीचे दर्शन घडविण्यात आले आहे. लोकमान्य टिळकसावित्रीबाई फुलेविविध देवींच्या नावाने असलेली प्रवेशद्वारेराम मंदिराची भव्य प्रतिकृती अशा विषयांवर आधारित सजावट करण्यात आली आहेयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजकांचे कौतुक केले.

रत्न आणि आभूषण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या उद्योजकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष हितेश जैन यांनी या उत्सवासाठी राज्य शासनपर्यटन विभागबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई पोलीस यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले

Featured post

Lakshvedhi