Saturday, 4 October 2025

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल -

 ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्यांच्याच काळात हा प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होतो आहे. ५८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याचे पुनरावलोकन करण्यात आले. या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा उड्डाणपूल (Viaduct), मार्गिका (Track) आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) पूर्ण झाल्या आहेत. तपासणी व प्रारंभिक चाचणी धाव दरम्यान लोड कॅल्क्युलेशनसाठी आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी आवश्यक माहिती गोळा करणेतसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींची जसे कीमेट्रो ट्रेन इत्यादी चाचणी घेऊन त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.

मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये :-

बीईएमएल (BEML) चे 6-डब्यांचे ट्रेन-सेट्सजे मेट्रो मार्ग 2 अ व 7 वर चालत आहेत त्याच पध्दतीच्या आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टमप्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणास्वयंचलित अग्निशमन शोध प्रणालीअडथळा (Obstacle) शोध उपकरणआपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजाऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणालीऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे 30% बचत) या सुविधा असतील.

या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व धाव चाचणी करूनएमएमआरडीए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग 4 व 4 अ कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होणार

 मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंत

प्रवाशांकरिता खुले होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो मार्ग-४ व ४ अटप्पा-१गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न

 

ठाणे, दि. २२ (जिमाका) :- मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६च्या ऑक्टोबरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतीलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मेट्रो मार्ग ४ (वडाळाकासारवडवली) व ४ अ (कासारवडवलीगायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलीत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकखासदार नरेश म्हस्केआमदार निरंजन डावखरेमाजी आमदार रवींद्र फाटकमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जीउपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोनाकोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ बद्दल माहिती देताना म्हणाले कीघाटकोपर-मुलुंड -गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४ अ ची २.८८ कि.मी. आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४मेट्रो ४ अमेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे कीपूर्व उपनगरेपश्चिम उपनगरेमुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहेअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सी' ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी

 परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सी'

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 22 : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटीदेणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल 'पॉड टॅक्सीअसून ही सेवालास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांच्या सेवेत आणावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेकुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशनमुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल.

मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची  सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजेया दृष्टीने  कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यातअसेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावीअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला  बृहन्मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारतीमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जीअपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठीअपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ताप्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग आदी उपस्थित होते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी आणि पोलिस आयुक्त श्री. भरती यांनी सादरीकरण केले.

सातारा, वाई, पाचगणी, पाटण, तळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा

 सातारावाईपाचगणीपाटणतळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपीस्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा आज शेकडो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कीहा फक्त उपक्रम नाही तर समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे ही व्यक्तिगत स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना एकटे नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे.

0000

सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या आयुष्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी

 

मुंबईदि. ०१ : सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार,  शिक्षक,  वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात. त्यांच्या अंगी असलेली अपार क्षमता योग्य उपचारशिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आलीतर ही मुले केवळ चालूच शकतात असे नाहीतर जगालाही दिशा देऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्वासामुळे या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमाने अनेक घरांमध्ये आशेचा नवा दीप प्रज्वलित केला आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेली दहा वर्षं सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करत आहेत. त्यांनी केवळ साहित्य पुरवले नाहीतर वैद्यकीय उपचारांपासून ते भावनिक आधारापर्यंत या मुलांना व त्यांच्या पालकांना सर्वंकष साथ दिली आहे. या कार्यासाठी त्यांना BT-CSR एक्सेलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

या फाउंडेशनने आजवर एक हजाराहून अधिक आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून आवश्यक त्या विशेष सेवा गरज असलेल्या मुलांपर्यंत पोहोचवली आहे. अनेक मुले जी आतापर्यंत चार भिंतींत अडकून पडली होतीत्यांना आता घरबसल्या उपचार व सुश्रुषा मिळत आहेत.

सातारावाईपाचगणीपाटणतळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रांमुळे फिजिओथेरपीस्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या सेवा आज शेकडो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. आतापर्यंत ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कीहा फक्त उपक्रम नाही तर समाजाच्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे ही व्यक्तिगत स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पुढाकारामुळे हजारो कुटुंबांना एकटे नसल्याची जाणीव निर्माण झाली आहे.

0000

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी :-

 पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी :-

नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्गलांबी २०४ किलोमीटरचंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटरभूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.

नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्गभूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्गलांबी ९४ किलोमीटरअंदाजित रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू.


समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था उभारण्यात

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेसमृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था उभारण्यात येत आहे. तसेच पेट्रोल पंपफूड मॉलची सुविधा असावी. स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागार नियुक्त करावा. महामार्गावर १६ पैकी किमान चार ठिकाणी तरी एमएसआरडीसीने पर्यटनाच्या दृष्टीने केंद्र निर्माण करावीत. राज्यात पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांकरिता निधी उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांच्या निधीतून भूसंपादनासह विकास प्रक्रिया राबवावी. पुढील विकासात त्यांचा सहभाग घेऊन निश्चित मोबदला त्यांना मिळण्याची व्यवस्था करावी. निधी उभारणीचे नवीन मॉडेल विकसित करावे.

बैठकीस अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकरअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ताप्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजयप्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवलेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi