Friday, 3 October 2025

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत; मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य

 वृत्त क्र. 3814

अतिवृष्टीपूर परिस्थितीतमदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य

जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

 

मुंबईदि. २२ :- राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात  असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात (परांडा तालुक्यातील मौजे लाची) येथे झालेल्या पावसामुळे १२ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी नाशिकवरून एअर फोर्सचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे आणि  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफपुणे येथील एक पथक रवाना करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीशेवगावजामखेडकर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफपुणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफधुळे येथील एक पथक पाठवण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे (सिंदफना नदी परिसर) या ठिकाणच्या नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी नगरपालिका बीड यांच्याकडील बोट पाठविण्यात आली. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफपुणे एक पथक शोध व बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे.

सोलापूर  जिल्ह्यात बार्शी  तालुक्यात सिना आणि भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफचे एक पथक रवाना व नगरपालिका बार्शी अग्निशमन दलाची बोट घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. तसेच सीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सचेत ॲप मधून सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चार गावे पूरग्रस्त असून हिवरा नदीला  पूर येण्याची शक्यता असल्याने  मदत व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठवण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहनही  राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

संपर्क :- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९००२२-२२७९४२२९९३२१५८७१४३

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव- ०२४७२-२२७३०१,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  अहिल्यानगर- ०२४१-२३२३८४४,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  बीड - ०२४४२-२९९२९९,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  सोलापूर- ०२१७-२७३१०१२,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  जळगाव -०२५७-२२१७१९३/२२२३१८०

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार

 माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 22 : सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान हा महत्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा या विभागामार्फत नागरिकांना पुरविल्या जातात. त्यामुळे आता माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करून डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. शासनाच्या सर्व सेवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणेकृत्रिम बुद्धिमत्ताबिग डेटा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

 सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

राज्यातील २,४५८ मेगावॅट  क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

प्रधानमंत्री  यांनी सौर ऊर्जा प्रकल्पातील लाभार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई, दि. २५ : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे.  मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे.. या  सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे  लोकार्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

              राजस्थान बांसवाडा येथे  ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन  प्रक्षेपण  बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बीराज्यातील पी एम  कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि पी एम  कुसुम सी बी - मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित  होते. या कार्यक्रमात  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी  संवाद  साधला.

दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयावर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयावर

 पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची मुलाखत

 

मुंबईदि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर सुरक्षा अभियान व जनजागृती’ या विषयावर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 6मंगळवार दि. 7बुधवार दि. 8 आणि गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत सहायक संचालक वृषाली मिलिंद पाटील यांनी घेतली आहे.

डिजिटल युगात मोबाईलइंटरनेट व सोशल मीडियामुळे जीवनमान अधिक सुलभ झाले आहेपरंतु त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे आव्हानही गंभीर स्वरुपात वाढत आहे. यासाठी नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यावर शासन सातत्याने भर देत आहे. याच अनुषंगाने डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत 25 सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत देशभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने सायबर सुरक्षा अभियानाद्वारे नागरिकांना जागरुक करण्यासाठी सुरु असलेले उपक्रमसायबर धोके व घ्यावयची दक्षताऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना पाळावयाचे नियम तसेच सोशल मीडिया हाताळताना घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील

 नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद

 

मुंबईदि. ४ : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीत मंत्री राणे यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीसमस्या जाणून घेतल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पाहणी दरम्याननुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक प्रशासनिक पावलेमदत आणि साहाय्य यावर चर्चा करण्यात आली. मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तातडीनेअचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना दिल्याजेणेकरून नुकसानाचे अचूक दस्ताऐवजीकरण होईल आणि त्यानंतर योग्य आर्थिक व प्रशासनिक मदत पोहोचवता येईल.

या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार अनुराधा चव्हाणमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेतसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या अडचणींवर चर्चा केली आणि तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाची तत्परता यावर भर दिला.

0000

सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून राज्याला अग्रीम; करापोटी ६,४१८ कोटी रूपये

 सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून राज्याला अग्रीम;

करापोटी ६,४१८ कोटी रूपये


· उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे मानले आभार


 


         मुंबई, दि. ३ : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.


            येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी व विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या

 सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

§  सायबर फसवणूक तक्रारीसाठी 'गोल्डन अवरमहत्वाचा

 

मुंबईदि. ०३ : रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्यास   अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही 'गोल्डन अवरमहत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्यालतेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

‘सायबर जनजागृती’ माह ऑक्टोबर २०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस मुख्यालय येथे झाले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लागृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहलअभिनेता अक्षय कुमारअभिनेत्री राणी मुखर्जीव्हीजेटीआयचे डॉ. फारूक काझीआयआयटी मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठ आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापरामुळे फिशिंगओटीपी फसवणूकडीपफेकआवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे. सोशल मीडियाऑनलाईन व्यवहारपेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून घोटाळेखंडणीसायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात.

  राज्यात जागतिक स्तराची सायबर सिक्युरिटी लॅबप्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे फसवणुकीनंतर तत्काळ कारवाई करून नुकसान कमी करता येते. मात्र यासाठी वेळेवर तक्रार होणे महत्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानच धोका असून त्यावर तंत्रज्ञान हाच उपाय आहे. डीपफेकसारख्या आव्हानांवर आपली क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कोणताही डिजिटल गुन्हा त्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे ठेवतो. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे आवश्यक असूनया कार्यात कम्युनिकेटर्सची महत्वाची भूमिका आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या की, नागरिकांना सजग ठेवण्यासाठी आणि त्यांचे त्वरित संरक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उल्लेखनीय जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देशातील प्रत्येक मोठ्या रेल्वे स्थानकावर दररोज सायबर सुरक्षा सूचना दिल्या जात आहेत. लाखो नागरिक हे संदेश दररोज त्यांच्या दैनंदिन जीवनात ऐकत आहेत. राज्य पोलीस यंत्रणाही जनजागृतीची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्येजिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सखोल जनजागृती मोहीम राबवत आहे.

यावेळी सायबर सुरक्षा विषयक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच 'सायबर योद्धाया लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सायबर यावेळी जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर वॉरियरचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी आभार मानले

Featured post

Lakshvedhi