Sunday, 7 September 2025

महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

 महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल - पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणेहा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर, आम्ही पर्यटकांसाठी एक असे व्यासपीठ निर्माण केलेजिथे ते या उत्सवाचा थेट अनुभव घेऊ शकले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.

पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना केवळ मिरवणूक पाहण्याचीच संधी मिळाली नाहीतर ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. ढोल-ताशांच्या गजरातभक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.


परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती

 परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती

या उत्सवाचे साक्षीदार ठरलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलेहा सोहळा म्हणजे केवळ उत्सव नाहीतर श्रद्धाएकता आणि आनंदाचा संगम आहे. लाखो लोक एकाच स्वरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना पाहून माझे मन थक्क झाले. अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भारतात येऊन हा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अनेक पर्यटकांनी गणरायाच्या मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली आणि या अविस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना गणेशोत्सवाची ऐतिहासिकसांस्कृतिक आणि आध्यात्मिक महती समजावून सांगितली.

अनंत चतुर्दशी : गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटकांनी अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती

 अनंत चतुर्दशी : गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पर्यटकांनी अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

 

            मुंबईदि.7  : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगांव चौपाटी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने संयुक्तपणे उभारलेल्या विशेष दालनाला भेट देत विसर्जन होत असलेल्या बाप्पाची आरती केली. यावेळी परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा थक्क करणारा अनुभव घेतला. तर, थायलंड येथून हा विसर्जन सोहळा अनुभवण्यास आलेल्या पर्यटकांनी आरतीतही सहभाग घेतला. याप्रसंगीमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.

            अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जनाच्या भव्य सोहळ्याने परदेशी पर्यटकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा अनमोल ठेवा त्यांनी आपल्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कायमस्वरूपी जतन केला.

गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी’ मॉरिशसकोरियाअमेरिकाथायलंडजपान आणि दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांना केवळ मिरवणुकीच्या भव्यतेचे दर्शनच घेता आले नाहीतर त्यांना गणरायाची श्रद्धेने पूजा करणेआरतीत सहभागी होणे आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सामील होण्याची संधी मिळाली. पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत सज्ज होऊनढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हे पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीत तल्लीन झाले.

या सोहळ्याला पर्यटन संचालनालयाचे संचालक  डॉ बी. एन. पाटीलपर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील; दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज, उद्योग-व्यवसायासाठी 15 लाखांचे कर्ज देण्याचा निर्णय

 आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती

रामोशीबेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील;

दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्जउद्योग-व्यवसायासाठी 15 लाखांचे कर्ज देण्याचा निर्णय

                                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        पुणेदि. 7  : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्जतसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेआमदार विजय शिवतारेगोपीचंद पडळकरराहुल कुलविक्रम पाचपुतेमाजी खासदार रणजितसिंह निंबाळकरमाजी आमदार संजय जगतापजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल,  दौलत शितोळेअंकुश जाधवमोहन मदने आदी  उपस्थित होते.

        इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

        रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्जतर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलिस भरतीसाठी विशेष योजनातसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातीलअसे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.

        ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणालेशासनाने ओबीसी मंत्रालयमहाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती42 वसतीगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारलेत्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

        ते म्हणालेउमाजी नाईक हे इंग्रजांच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवणारे पहिले नेते होते. रॉबर्टने ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात ‘उमाजी नाईक गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच लढतात’ असा उल्लेख आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहत त्यांनी सामान्यांसाठी आज्ञापत्र काढले. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. रामोशी-बेडर समाजाला घाबरवण्यासाठी इंग्रजांनी त्यांना फाशी दिलीतरीही हा समाज स्वातंत्र्यलढ्यात मागे राहिला नाही. इंग्रजांच्या कारस्थानामुळे समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसलाजो स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी पुसला गेला.

       


सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालयस्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे अनेक वंचित घटकांतील तरुण तहसीलदारपोलीस निरीक्षकवैमानिक होऊ शकले.

        आमदार पडळकर यांनी मनोगतात राज्य शासनाने इतर मागासांसाठी केलेल्या कामांची माहिती सांगूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्मारक होत असल्याचे आणि आता पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकरमध्ये स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले.

        जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रास्ताविकात रामोशी-बेडर समाजाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला.

        कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री स्व. गिरीश बापटमाजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णेस्व. रामभाऊ जाधवस्व. सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारतर बाबुराव जमादारछगन जाधव व बाबुराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

        मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाने उभ्या केलेल्या कक्षाला भेट देऊन राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

        कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

०००००

नगरोत्थानसाठी स्वतंत्र प्रकल्प कक्ष

 नगरोत्थानसाठी स्वतंत्र प्रकल्प कक्ष

त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानासाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करून अमृत २ अभियानाच्या धर्तीवर स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच अमृत 2.0 अभियानाच्या पोर्टलवरील माहिती प्रत्येक १५ दिवसांनी अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक संस्थेत नोडल अभियंता नेमण्यात येणार असून माहिती वेळेत अद्ययावत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

मंजुरी दिलेल्या प्रकल्पाबाबत

 तर कारवाई करणार

 प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारप्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अथवा अंमलबजावणी करणारे अधिकारी यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे

अमृत अभियानासाठी नवीन प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार  नेमण्यास मान्यता देण्यात आली असूनतोपर्यंत विद्यमान पीडीएमसीसी कार्यरत राहील.

 सर्व करारनामे व कार्यादेश  शासनाने दिलेल्या मानकानुसार  करणे अनिवार्य राहणार आहे.

मासिक अहवाल बंधनकारक

प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मासिक अहवाल शासनाकडे सादर करणे सर्व संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र स्वरूपाचा नमुना उपलब्ध करून देण्यात येईल.

..प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा

 ...प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

अमृतनगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल

 

मुंबईदि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला. प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.

यामुळे अमृत - २ आणि नगरोत्थान मधील प्रकल्पांची गती वाढूनअधिक पारदर्शकता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जबाबदारी निश्चित करता येईल.

नवीन तरतुदीनुसारप्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देताना ठेकेदाराकडून वास्तववादी नियोजन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसार्वजनिक बांधकाम विभागवन विभाग आदींकडून आवश्यक परवानग्या वेळेत न मिळाल्यास मंत्रालयीन स्तरावर थेट पाठपुरावा करण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi