Saturday, 23 August 2025

अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

 अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. १८ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

 गोड्या पाण्यातील मत्स्योद्योगाचे

यवतमाळ जिल्हा आदर्श मॉडेल तयार करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १८ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना एकत्रित करून यवतमाळ जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा आराखडा तयार करावा असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

यवतमाळ जिल्ह्यातील मत्स्य संवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. बैठकीला माजी आमदार मदन येरावारआयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यवतमाळ जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करून ते राज्यात सर्वत्र राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले कीयवतमाळ जिल्ह्यात मत्स्योद्योग विकासासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात याव्यात. मच्छीमारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

०००००

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच

 कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 18 : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणी पुरातात्त्विक मूल्य आहेस्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे आस्थेचेश्रद्धेचे आणि निष्ठेचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामे केली जातीलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.


सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीगाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर आहे. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांचीआय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी बाह्य तज्ज्ञांची मदत घेतली जावी. याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावाअशाही सूचना श्री.शेलार यांनी दिल्या.

दरम्यानमंदिर परिसरातील अन्य सुरू असलेली कामे थांबविण्याची आवश्यकता नसल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.

ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रातील युके व

सामंजस्य करार आठ व्यतिरिक्त याशिवायग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रातील युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

सामंजस्य करार (८)

 डेटा सेंटरलॉजिस्टिक सेंटर रिअल इस्टेट या क्षेत्राकरिता प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि.या कंपनीसोबत 12500 कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. 8700 रोजगार निर्मिती

सामंजस्य करार (७)

 औद्योगिक उपकरणे क्षेत्राकरिता ॲटलास्ट कॉपको या कंपनीसोबत 575 कोटी रूपयांचा करार. 3400 रोजगार निर्मिती.

सामंजस्य करार (६)

 वेबमिंट डिजिटल प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटरकरिता 4846 कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. 2050 रोजगार निर्मिती.

Featured post

Lakshvedhi