मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक आहे. या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसऱ्या टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू. ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे. गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 22 August 2025
एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले. दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच ‘हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएल, व्हिएसटीएफ व छत्रपती संभाजी नगर महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे
कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन
- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी
मुंबई, दि. २१ : कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, मुख्य सचिव राजेश कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशी, टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, जीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन, यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन मुंबई, दि.
शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.
या अभ्यासगटामध्ये अपर मुख्य सचिव (जलसंपदा); अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम); प्रधान सचिव (ग्रामविकास); प्रधान सचिव (व्यय) वित्त विभाग; सचिव/ प्रधान सचिव (रोजगार हमी योजना); यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशु; जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख; सह/ उपसचिव विधी व न्याय विभाग; उपसचिव (जमीन-१अ) महसूल व वन विभाग हे समितीचे सदस्य तर, सह सचिव (ल-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय हे समितीचे सदस्य सचिव राहतील.
हा अभ्यासगट अस्तित्वात असलेल्या शेत व पाणंद रस्ते योजनांचा अभ्यास करणे; नागपूर, अमरावती व लातूर जिल्ह्यांमध्ये शेत रस्त्यांबाबत राबविण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास करणे; जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करणे; शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष ठेवावे किंवा कसे?, सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेनुसार Convergence ने योजना पूर्ण होते किंवा कसे?, त्याकरिता कोणत्या लेखाशीर्षातून किती निधी उपलब्ध करावा, याचे निश्चित परिमाण ठरविणे; सदर योजना कोणत्या विभागामार्फत राबवावी याबाबत अभ्यास करणे; महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना कायदेशिररित्या तपासून अहवाल सादर करणे या मुद्यांचा अभ्यास करून महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस वेळोवेळी अहवाल सादर करेल.
समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव (महसूल) यांना विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटेल अशा अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी किंवा तज्ज्ञ व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच वर नमूद कार्यकक्षेव्यतिरिक्त आणखी काही शिफारशी करावयाच्या असल्यास समितीस स्वातंत्र्य राहील. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुंबई, दि. २१ : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला तसेच संबंधित यंत्रणांना दिले.
ग्रामविकास मंत्री गोरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी निवासी आयुक्त यांनी प्रस्तावित केलेल्या बचतगट वस्तू प्रदर्शन व विक्री दालनबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच श्री. गोरे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.
महाराष्ट्र सदनात येत्या काळात बचतगटातील महिलांसाठी फिरते दालन उपलब्ध करून दिले जाईल. या दालनात गृहोपयोगी तसेच सजावटीच्या आणि वाळवणाच्या वस्तू यासह एक जिल्हा उत्पादन, भौगोलिक मानांकन असणारे उत्पादन अशा वस्तू राहतील. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना राजधानीत व्यासपीठ उपलब्ध होईल असे श्रीमती विमला यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली असून स्वयं सहायता गटांचे दालन महाराष्ट्र सदनात सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित देखील केले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी
निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती
मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून सुशीलकुमार लोहानी, आयएएस (ओडिशा कॅडर : १९९५), अतिरिक्त सचिव, पंचायती राज मंत्रालय आणि डी. आनंदन, आयएएस (सिक्कीम कॅडर : २०००), अतिरिक्त सचिव, वित्त मंत्रालय (व्यय विभाग) यांची नियुक्ती केली आहे.
याशिवाय, नितीनकुमार शिवदास खाडे, आयएएस (आसाम-मेघालय कॅडर : २००४), संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय (भूमी संसाधन विभाग) यांना राखीव यादीत स्थान देण्यात आले आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीचे संपूर्ण आयोजन पारदर्शक आणि सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...