Friday, 22 August 2025

गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास pl share

 यासाठी गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारीपोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्याततसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले. दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएलव्हिएसटीएफ व छत्रपती संभाजी नगर महापालिकासामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे

 कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन
  • महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी

 

मुंबईदि. २१ :  कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकरमुख्य सचिव राजेश कुमारग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशीटाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटाजेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदालआयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्माजीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणनयांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य  उपस्थित होते.

दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

 दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत

 

मुंबईदि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या विषयाच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासआणि जय महाराष्ट्रया कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

 ‘दिलखुलासकार्यक्रमातील ही मुलाखत शुक्रवार दि. २२ आणि शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तर  जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारदि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

राष्ट्रीय महिला आयोगनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्य सहभागी होणार असूनमहिलाविषयक कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणीपरस्पर सहकार्यमहिलांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाययोजना आणि देशव्यापी कृती आराखडा तयार करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचे नियोजनअंमलबजावणी व अपेक्षित उद्दिष्टांबाबतची सविस्तर माहिती अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांनी दिलखुलासव जय महाराष्ट्रकार्यक्रमात दिली आहे.

०००

शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

 शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन

मुंबईदि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

या अभ्यासगटामध्ये अपर मुख्य सचिव (जलसंपदा)अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम)प्रधान सचिव (ग्रामविकास)प्रधान सचिव (व्यय) वित्त विभागसचिव/ प्रधान सचिव (रोजगार हमी योजना)यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशुजमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेखसह/ उपसचिव विधी व न्याय विभागउपसचिव (जमीन-१अ) महसूल व वन विभाग हे समितीचे सदस्य तरसह सचिव (ल-१)महसूल व वन विभागमंत्रालय हे समितीचे सदस्य सचिव राहतील.

हा अभ्यासगट अस्तित्वात असलेल्या शेत व पाणंद रस्ते योजनांचा अभ्यास करणेनागपूरअमरावती व लातूर जिल्ह्यांमध्ये शेत रस्त्यांबाबत राबविण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास करणेजमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेखमहाराष्ट्र राज्यपुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करणेशेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष ठेवावे किंवा कसे?, सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेनुसार Convergence ने योजना पूर्ण होते किंवा कसे?, त्याकरिता कोणत्या लेखाशीर्षातून किती निधी उपलब्ध करावायाचे निश्चित परिमाण ठरविणेसदर योजना कोणत्या विभागामार्फत राबवावी याबाबत अभ्यास करणेमहसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना कायदेशिररित्या तपासून अहवाल सादर करणे या मुद्यांचा अभ्यास करून महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीस वेळोवेळी अहवाल सादर करेल.

समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव (महसूल) यांना विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटेल अशा अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी किंवा तज्‍ज्ञ व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच वर नमूद कार्यकक्षेव्यतिरिक्त आणखी काही शिफारशी करावयाच्या असल्यास समितीस स्वातंत्र्य राहील. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Thursday, 21 August 2025

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

 गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

 

मुंबईदि. २१ : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

 

यासाठी गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारीपोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्याततसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.


आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले की, आयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा

 आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले कीआयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. व्हीएसटीएफच्या सहकार्याने पाच जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. तसेच शासकीय रुग्णालयांच्या मदतीसाठी निधी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक ब्रँच गावातील एक शाळा व विभागीय कार्यालये ही प्रत्येकी एक रुग्णालय दत्तक घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे.

Featured post

Lakshvedhi