Thursday, 21 August 2025

महिला, बालक व सामाजिक गटांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

 महिलाबालक व सामाजिक गटांसाठी  योजनांची प्रभावी अंमलबजावणी

-         उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारण्याचे निर्देश

 

मुंबई दि.२० : राज्यातील महिलाबालक आणि सामाजिक गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

गरोदर मातालहान बालके आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने योजना राबवाव्यात तसेच पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारावे असे निर्देशही त्यांनी दिले.

 

मंत्रालयात आयोजित बैठकीत अपर मुख्य सचिव (अर्थ) डॉ. राजगोपाल देवरा यांनी महिला व बालकांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचा तुलनात्मक अभ्यासविभागनिहाय तरतुदी आणि खर्चाचे सादरीकरण केले. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरासचिव डॉ. अनुप कुमार यादवआयुक्त ज्योत्स्ना पडियार तसेच युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्प

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्प

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मीटर पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे.  या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आले. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील

एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

पुणेदि.२० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.

 

यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआमदार सिद्धार्थ शिरोळेबापूसाहेब पठारेहेमंत रासणेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर रामपुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मापुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसेअतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगलाजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

 

डॉ. म्हसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाबाबत माहिती दिली.

पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.

 कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीत आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.

सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन

 सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटचे उद्घाटन

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात साई देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि. २० : कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यकता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात साई’  ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या (एसएआयआय- साई) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदारयावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकरकुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण‘एसएआयआय’च्या संचालक प्रा. डॉ. लवलीन गौर आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा

 आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी

अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा

 

मुंबईदि. २० :- राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ.भालचंद्र चव्हाण यांनी राज्यातील हवामानाविषयी अनुषंगिक माहिती दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ज्या जिल्ह्यात रेड अलर्टऑरेंज अलर्ट दिले आहेतत्या ठिकाणी संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वेळीच दक्षता इशारा देण्यात यावेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावेअशा सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून राज्यातील पर्जन्यमांचे अंदाज नागरिकांना वेळेत दिले जावेत. आवश्यक त्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीतअशा सूचनाही आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला विभागाच्या योजनांचा आढावा

 महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 

घेतला विभागाच्या योजनांचा आढावा

 

मुंबई, दि. २० : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानासह बाल संगोपनमिशन वात्सल्य आणि मातृ वंदना योजना यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

मंत्रालयात आयोजित बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त कैलास पगारेसहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

            आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य समस्याकुपोषणबालमृत्यू व मातृमृत्यूचे प्रमाण कमी करणेलैंगिक व शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे तसेच हिंसामुक्त कुटुंब व समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यभर ३६ जिल्ह्यांमध्ये व १५० तालुक्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर समिती गठित करण्याचे काम सुरू असून उर्वरित तालुक्यांमध्ये समित्या तातडीने स्थापन करण्याचे निर्देशही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी दिले.

कोरोना काळात सुरू झालेल्या एकल महिलांसाठीच्या योजनेची व्याप्ती वाढवून विधवापरित्यक्ता व एकल महिला यांचा समावेश करण्यात यावाअसे निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले. बाल संगोपन योजनेसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मिशन वात्सल्य आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.

आयुक्त कैलास पगारे म्हणाले कीमातृ वंदना योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे शंभर टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून लाभार्थींना योजनेचा थेट फायदा होणार आहे.

Featured post

Lakshvedhi