प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, सरकारी योजनांची सखोल माहिती व सहयोगाने गावोगावी उत्तम परिणाम साधता आला आहे. व्हीएसटीएफ आणि भागीदार असलेल्या खासगी कंपन्यांमुळे ग्राम विकास परिवर्तनात चांगले काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 21 August 2025
व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी
व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर धोरणात्मक बदल, नवी तंत्रज्ञान, डेटा आधारित प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी दिली. हे परिवर्तन केवळ योजना राबवणे नव्हे, तर गावात समर्पित व्यक्तींची उपस्थिती, सामाजिक बांधिलकीने काम करणारे फेलोज आणि स्थानिक पातळीवर संस्था उभ्या करण्यावर लक्ष केंद्रीत होते, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक आहे. या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसऱ्या टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू. ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे. गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकी
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, मुख्य सचिव राजेश कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशी, टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, जीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन, यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे
कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन
- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत ग्राम परिवर्तनासाठी कंपन्यांची सहकार्याची हमी
मुंबई, दि. २१ : कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘एमकेसीएल’ने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘एमकेसीएल’ प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्त्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात ‘एमकेसीएल’ची भूमिका महत्त्वाची
राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात
‘एमकेसीएल’ची भूमिका महत्त्वाची - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य अखंडपणे केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एमकेसीएल’ आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. ‘एमकेसीएल’ने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...