Thursday, 21 August 2025

अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 'अंधत्व मुक्त महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला 'दृष्टी यज्ञ'च्या माध्यमातून बळ

  • आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण

 

मुंबईदि. २१ : अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनवनसाईट एसीलर लक्सोटिका फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला असून आतापर्यंत १९ जिल्ह्यांच्या १८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था व कलाकारांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान

 राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था व कलाकारांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतात. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो.  गेली अनेक वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्था व कलाकारांनी पारितोषिक रकमानाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात वाढ करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन यामध्ये दुपटीने वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयातील पारितोषिक रकमानाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्ता इ. तील वाढीव रकमांचा लाभ ३ नोव्हेंबर२०२५ पासून सुरु होणाऱ्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून लागू होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ

 राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमानाट्यनिर्मिती

खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतोतसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतर्गत हौशी मराठीहिंदीसंगीतसंस्कृतबालनाट्यदिव्यांग बालनाट्य व व्यावसायिक नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

किमया कार्लेचंही अभिनंदन

 किमया कार्लेचंही अभिनंदन

नव्या ऑलिंपिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ मार्क ओलांडणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट म्हणून किमया कार्ले हिचंही मंत्री कोकाटे यांनी अभिनंदन केलं. क्लुज-नापोका (रोमानिया) २०२५ क्लब स्पर्धेत किमयाने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिचं कौतुक करताना कोकाटे यांनी तिला रिदमिकची किमयागार अशी उपाधी दिली.

0000

महाराष्ट्राची हिरकणी” असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे

 या संभाषणात मंत्री कोकाटे यांनी महाराष्ट्राची हिरकणी असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीनेही तिला शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसह प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहनही मंत्री कोकाटे यांनी केले.

संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिमनॅस्ट असून ती पाचव्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमीठाणे येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूप्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

आजवर संयुक्ताने  इंडिया युवा खेळराष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून १५० पदकं (१२५ सुवर्ण) जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवला आहे. याच स्पर्धेत मानसी गावंडे यांची भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

 रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून

जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

महाराष्ट्राची हिरकणी म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी

थेट संपर्क साधण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिनॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीवरून संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.


आयर्विन पूल सांगली येथे कृष्णा नदीने धोका पातळी पार केली असून, विसर्ग कमी केल्याने सांगली जिल्ह्यातील

 सध्या आयर्विन पूल सांगली येथे कृष्णा नदीने धोका पातळी पार केली असूनविसर्ग कमी केल्याने सांगली जिल्ह्यातील पाणी फुगवटा आज दुपार पासून ओसरण्यास सुरुवात होईल. सांगली जिल्ह्यातील राज्यमार्ग ०७प्रमुख जिल्हा मार्ग-१५ग्रामीण मार्ग - ०८इतर जिल्हा मार्ग ०१ इत्यादी रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. उजणी धरण १०० टक्के भरल्याने १३०००० क्युसेक्स एवढा जास्तीचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला असून भीमा नदी काठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकानी पाणी फुगवटा झालेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील नवजा-कोयनानगर पाबळनाला रस्ता खचल्याने आणि निसरे ते मारुल हवेली पूलावर पाणी वाहत असल्याने वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi