Thursday, 21 August 2025

अलमट्टी धरणाच्या विसर्गावर लक्ष

 अलमट्टी धरणाच्या विसर्गावर लक्ष

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून अलमट्टी धरणाच्या विसर्ग, (250000 क्युसेक्स) व येवा तसेच धरणाची पाणी पातळी व सांगलीकोल्हापूरसातारा (ता. कराड) जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचण्याची स्थिती यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच साताराकोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अलमट्टी धरणातील पाणी साठ्यामुळे फुगवटा तयार  होऊ नये यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. कोयना धरणातून ९३००० क्युसेक्स वरुन ८०००० क्युसेक्सवारणा धरणातून ३८००० क्युसेक्स वरुण १३७०० क्युसेक्स एवढा विसर्ग कमी करून कृष्णा नदीवरील इतर धरणातून सुद्धा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणातून २८६० क्युसेक्स एवढा विसर्ग  नदीपात्रात करण्यात आला असून पंचगंगा  नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे.  नागरिकांचे आवश्यक स्थलांतर करण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांच्या कंपनी मार्फत

 नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांच्या कंपनी मार्फत स्थलांतरित शिबिरात चिकीत्त्सा शिबीर लावले व ३८२ स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली असून प्रशासनातर्फे आपत्ती नंतरच्या कामांना गती देण्याबाबत सूचित केले आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी मौजे पडळघर, संभाव्य दरड

 पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी मौजे पडळघर, संभाव्य दरड प्रवण धोका असल्याने येथील ९ कुटुंब व रामनगर येथील २ कुटुंब अशी एकुण ११ कुटुंबे लवासा सिटी येथे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील ता. आंबेगाव मौजे घोडेगाव येथील घोडनदी काठी ५ व्यक्ती अडकले असता आपदा मित्रांनी रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. पुणे जिल्ह्यातील वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय येथील शिवणे नांदेडसिटी रस्ते, भिडे पुल रस्ते, रजपूत झोपडपट्टी ते मनपा मुख्यालय रस्ते सुरक्षेस्तव बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व रायगड जिल्ह्यातील अंबा, ठाणे जिल्ह्यातील काळू नदीने

 रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी व रायगड जिल्ह्यातील अंबाठाणे जिल्ह्यातील काळू नदीने इशारा पातळी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला उंच लाटांचा इशारा

 ठाणेपालघररायगडरत्नागिरी जिल्ह्याला उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून (INCOIS) ठाणेपालघरया जिल्ह्यांना दि.२० ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत ३.० ते ३.७ मीटर तसेचरायगडरत्नागिरी जिल्ह्याला दि.२० ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० पर्यंत २.७ ते ३.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्टमागील सात दिवसात हवामानाचे

२३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 

मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील ७ दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत SMS च्या माध्यमातून  पोहचवण्यात आले आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.


महिला, बालक व सामाजिक गटांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

  

महिलाबालक व सामाजिक गटांसाठी  योजनांची प्रभावी अंमलबजावणी

-         उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारण्याचे निर्देश

 

मुंबई दि.२० : राज्यातील महिलाबालक आणि सामाजिक गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

गरोदर मातालहान बालके आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने योजना राबवाव्यात तसेच पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेत दिव्यांग भवन उभारावे असे निर्देशही त्यांनी दिले.

 

मंत्रालयात आयोजित बैठकीत अपर मुख्य सचिव (अर्थ) डॉ. राजगोपाल देवरा यांनी महिला व बालकांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचा तुलनात्मक अभ्यासविभागनिहाय तरतुदी आणि खर्चाचे सादरीकरण केले. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरासचिव डॉ. अनुप कुमार यादवआयुक्त ज्योत्स्ना पडियार तसेच युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi