Monday, 18 August 2025

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता

 नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूउणे प्राधिकार पत्रावर

मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. १८ :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यूझाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावीजखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावीअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील यांनी सांगितलेअतिवृष्टीमुळे घरांची पडझडघरे पूर्णपणे बाधित किंवा अंशतः बाधित झाल्यास त्याचेही तातडीने पंचनामे करून त्यांना  मदत देण्यात यावी. तसेच  टपरीधारकछोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी. ही मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठीही शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आहरित करण्यास शासनाने या पूर्वीच परवानगी दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन ते तीन दिवसा पासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना तात्काळ मदत मिळावी, त्यांना दिलासा देण्याचे प्रशासनाने काम करावे. तसेच या बाधितांना शासन निकषानुसार मदत करावीअसे निर्देशही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश

 अतिवृष्टीपुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश

 

मुंबईदि. १८ :- राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीकफळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब  सादर करावाअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितलेभारतीय हवामान विभागाने विदर्भमराठवाडाकोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा  दिला आहे.  प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे.

            मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले कीशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टीपुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावाअसेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 वर संपर्क साधावा.

 या आजारांसाठी मिळते मदत

 

• कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६)

• हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरो प्रत्यारोपण

• कर्करोग (शस्त्रक्रियाकेमोथेरपीरेडिएशन)

• रस्ते अपघात

• बालकांच्या शस्त्रक्रिया

• हिप व गुडघा रिप्लेसमेंट

• मेंदूचे आजारडायलिसिसअस्थिबंधन

• बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण

• नवजात शिशुंचे आजार इत्यादी २० प्रकारच्या गंभीर आजारांसाठी मदत प्रदान केली जाते.

 

आवश्यक कागदपत्रे

• रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड

• रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)

• तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी)

• वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र

• एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)

• ZTCC पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात पुढील ईमेलवर पाठवा: aao.cmrf-mh@gov.in

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 वर संपर्क साधावा.

संपूर्ण राज्यातील गरजूगरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कक्षात केलेल्या  विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत आणि खऱ्या गरजूंपर्यंत निधी पोहोचत आहे.

— रामेश्वर नाईक,

कक्ष प्रमुखमुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षमहाराष्ट्र

0000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतूनअमरावती विभागातील

१,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत

 

मुंबई, दि. 18 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा आधार ठरत आहे. अमरावती विभागात मागील सात महिन्यांमध्ये तब्बल १,१८७ रुग्णांना १० कोटी ६१ लाख ११ हजार  रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. प्रथम रुग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाआयुष्मान भारतराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतीलतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतोअशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

 

अमरावती विभागातील मदतीचा आढावा

 (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

जिल्हा          रुग्णसंख्या             मदत रक्कम

बुलढाणा           443                            3,67,89,000

अकोला            265                             2,36,44,000

अमरावती         231                              2,21,45,000

वाशीम             139                              1,35,80,000

यवतमाळ          109                              99,53,000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने

चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

मुंबई, दि. 18 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मदतीतून वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात राहणाऱ्या सात वर्षीय देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही महागडी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने पार पडल्याचे समाधान मुलीच्या पालकांनी व्यक्त केले.

रवींद्र गावंडे (रा. वरूड बु.) यांच्या मुलीला जानेवारी २०२५ मध्ये तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. मुलीची अकोला आणि त्यानंतर नागपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. तसेच तिचे यकृत तातडीने प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला.

भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या देवांशीच्या वडिलांसमोर एवढी मोठी रक्कम गोळा करण्याचा पेच निर्माण झाला होता. दरम्यानमुलीच्या वडिलांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळताच या कक्षाकडे त्यांनी मदत मागितली. याशिवाय सोशल मीडियावर मदतीकरिता आवाहन केले. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षटाटा ट्रस्टसामाजिक संस्था तसेच गावकऱ्यांच्या वर्गणीतून आर्थिक मदत उपलब्ध झाली.

देवांशीला तिची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून मुलीवर ७ जुलै २०२५ रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता देवांशीची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. नुकताच  ऑगस्ट रोजी पालकांनी तिचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आपल्या मुलीला पुनर्जीवन मिळाल्याचे समाधान देवांशीच्या पालकांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्रत्येक गरजूगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. देवांशी त्याचेच एक उदाहरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कक्ष काम करत असून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष तत्पर आहे. या कक्षाचा फायदा सामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

 राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे

राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

 

मुंबईदि. १८ : राष्ट्रीय महिला आयोगनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ आणि २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे.

राज्यस्तरावर कार्यरत आयोगांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणेमहिलाविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच देशव्यापी कृती आराखडा तयार करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. देशभरातील महिलांसमोरील सामाजिक प्रश्नधोरणात्मक मुद्दे व विविध विषयांवर सखोल चर्चा यावेळी होणार आहे.

कार्यशाळेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्यासह ओडिशाआसामउत्तर प्रदेशकेरळकर्नाटक अशा विविध राज्यांतील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्य यामध्ये सहभागी होत आहेत. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी वक्ते अनुभव व विचार मांडणार असून१६० मान्यवरांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग व उत्तर प्रदेश महिला आयोग यांच्या सहकार्याने अशाच प्रकारची क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत होत असलेल्या या कार्यशाळेकडे देशभरातील महिला आयोगांचे लक्ष लागले आहे.

000

खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम

 या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम शासनस्तरावरून जलद पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र गुंतवणूक स्नेही राज्य आहे. इज ऑफ ड्यूइंग बिसनेससाठी सध्या काम सुरू आहे. गुंतवणूकदारण कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही काम करत आहोत. कोणतीही अडचण आल्यास ती तत्परतेने सोडवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोल्डमन सॅक्सचे नव्या कार्यालयासाठी अभिनंदन केले.

गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले कीभारतीय बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी म्हणाले कीहे नवे कार्यालय आमच्या भारतातील प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या नव्या जागेच्या रचनेत सहकार्यनवोपक्रम आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi