Sunday, 17 August 2025

18 ऑगस्टला शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल

18 ऑगस्टला शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल

मुंबईदि. 17 - शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

शासनाच्या दिनांक ०2 मे 2025 च्या पत्रान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या प्रसिद्धी निवेदना‌द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. या परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परोक्षस एकूण २११३०८ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बी.एड. परीक्षेचे १५,७५६ ॲपिअर व डी.एल.एड. परीक्षेचे १,३४२ ॲपिअर  असे एकूण १७,०९८ विद्यार्थी/उमेदवारांनी ॲपिअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी दि. १४ ऑगस्ट २०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९,९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १०,७७९ ॲपिअर  विद्यार्थी / उमेद‌वारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा /उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

तथापि ज्या विद्यार्थी/ उमेद‌वारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे या कार्यालयास अ‌द्यापपर्यंत सादर केलेले नाहीअशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे ५,८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६,३१९ ॲपिअर वि‌द्यार्थ्यांचा उमेदवारांचा  निकाल राखीव ठेवण्यात येईल.

तरी वि‌द्यार्थ्यांनी/ उमेदवारांनी अ‌द्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये विहित मुदतीत माहिती सादर केली नाहीअशा विद्यार्थी/उमेदवारांनी दिलेल्या लिंक‌द्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाहीयाची सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावीअसेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

माझं सोलापूर, सुंदर सोलापूर’ हा संकल्प

 माझं सोलापूरसुंदर सोलापूर’ हा संकल्प-जयकुमार गोरे

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे नमूद करून पालकमंत्री श्री.गोरे म्हणालेया दोन्ही प्रकल्पांमुळे साडेतेराशे कुटुंबांना हक्काचे घर वाजवी किंमतीत मिळणार आहे. प्रकल्पांतर्गत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंधरा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. शहरी आणि ग्रामीण नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा वर्षात १० लाख २६ हजार घरे सामान्य नागरिकांना देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यात गरजूंसाठी ३० लाख घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.

 सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. समांतर जलवाहिनीमुळे शहरातील पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.  जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची समस्या दूर झाल्याने लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी ८७२ रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. सोलपूर-गोवा विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. सोलापूर येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझं सोलापूरसुंदर सोलापूर’ हा संकल्प करण्यात आला असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली

सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

 सामान्यांसाठी घरे उभारण्याचा सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

ग्रामीण भागात  प्रधानमंत्री आवास  योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखापेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकूल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहेअशा शब्दात श्री.फडणवीस यांनी प्रकल्पाचे कौतुक केले.

दहिटणे येथील मॉडेल हाऊसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

 प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे येथील मॉडेल हाऊसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मॉडेल हाऊस ची पाहणी केली. व समाधान व्यक्त केले. त्यानंतर येथील कोनशीला अनावरण ही करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर प्रातिनिधीक स्वरुपात घरकूलाच्या १० लाभार्थ्यांना चावीचे वितरण करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ४ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  धनादेशाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोलापूर सोशल फाऊडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार विजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. दोन्ही

 यावेळी आमदार विजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरांचे काम अत्यंत चांगले झाले असून लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. सोलापूर शहरात रस्तेआरोग्य आदी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सोलापूर शहरात मुलभूत सुविधांसोबत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. येत्या काळात शहराचा औद्योगिक विकासही होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी तसेच येथील बेरोजगार तरुण येथे स्थलांतर थांबावे यासाठी मोठा उद्योग देण्याची मागणी त्यांनी केली.

माझं सोलापूर, सुंदर सोलापूर’ हा संकल्प

 माझं सोलापूरसुंदर सोलापूर’ हा संकल्प-जयकुमार गोरे

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे नमूद करून पालकमंत्री श्री.गोरे म्हणालेया दोन्ही प्रकल्पांमुळे साडेतेराशे कुटुंबांना हक्काचे घर वाजवी किंमतीत मिळणार आहे. प्रकल्पांतर्गत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंधरा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. शहरी आणि ग्रामीण नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा वर्षात १० लाख २६ हजार घरे सामान्य नागरिकांना देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यात गरजूंसाठी ३० लाख घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.

 सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. समांतर जलवाहिनीमुळे शहरातील पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.  जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची समस्या दूर झाल्याने लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी ८७२ रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. सोलपूर-गोवा विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. सोलापूर येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझं सोलापूरसुंदर सोलापूर’ हा संकल्प करण्यात आला असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

 सामान्यांसाठी घरे उभारण्याचा सोलापूर पॅटर्न’ राज्याला मार्गदर्शक

ग्रामीण भागात  प्रधानमंत्री आवास  योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखापेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकूल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहेअशा शब्दात श्री.फडणवीस यांनी प्रकल्पाचे कौतुक केले.

Featured post

Lakshvedhi