Sunday, 17 August 2025

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल

 

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल-मुख्यमंत्री

सोलापूर दि. १७ :  सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील.  शहरात  उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांगली dpdcअशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, कृषि सिंचन व उत्पादन, औद्योगिक व आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, प्रलंबित कामे व

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीकृषि सिंचन व उत्पादनऔद्योगिक व आर्थिक विकासपायाभूत सुविधाप्रलंबित कामे व अपेक्षापर्यटनपूरनियंत्रणआरोग्यविद्युतसौर प्रकल्परोजगार निर्मितीएमआयडीसीसार्वजनिक बांधकाम विभागपाटबंधारे विभागसांगली जिल्ह्यातील लोकांच्या प्रमुख अपेक्षाअडचणींवर मात करण्याच्या उपाययोजना आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.

सांगली dpdc अजित पवार म्हणाले, प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावे

 रांजणीचे प्रस्तावित ड्राय पोर्टसलगरेचे मल्टीमोडल लॉजस्टिक पार्कशक्तीपीठ महामार्ग आदि प्रश्नी योग्य तो मार्ग काढूअसे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेप्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य कामांवर व विहित वेळेत खर्च करावा. निधीचा अपव्यय होणार नाहीकामे दर्जेदार होतीलयाकडे लक्ष द्यावे. तसेचजिल्हा नियोजन समितीमधून स्थानिक स्वराज्य सस्थांना मिळणारा निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहणार नाहीयाची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावीअसे त्यांनी सूचित केले.

            राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून, 150 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावेअसे सांगून सांगली महानगरपालिका इमारतीसाठी निधीमहापालिका क्षेत्रात पीएम ई बस चार्जिंग स्टेशननाट्यगृह व ऑडिटोरियम आदिंबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतीलअसे त्यांनी स्पष्ट केले

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू

 सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू

   - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

·         विविध विकासकामेयोजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश

·         प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे

·         डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाहीयाची दक्षता घेण्याचे आवाहन

·         ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा

·         ऊस उत्पादकसाखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा

 

            सांगलीदि. 16, (जि. मा. का.) सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक मान्यवरांना नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामकाजात या जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांना प्रशासनाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावायासाठी राज्य शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करूअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

            सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणसंसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटीलआमदार सर्वश्री सदाभाऊ खोतइद्रिस नायकवडीडॉ. सुरेश खाडेसुधीर गाडगीळ आणि सत्यजीत देशमुख तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेपोलीस अधीक्षक संदीप घुगेमहानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

18 ऑगस्टला शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकालhttps://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये

 18 ऑगस्टला शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकालhttps://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये 

मुंबई, दि. 17 - शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

शासनाच्या दिनांक ०2 मे 2025 च्या पत्रान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक १६ जुलै २०२५ रोजीच्या प्रसिद्धी निवेदना‌द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. या परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परोक्षस एकूण २११३०८ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बी.एड. परीक्षेचे १५,७५६ ॲपिअर व डी.एल.एड. परीक्षेचे १,३४२ ॲपिअर असे एकूण १७,०९८ विद्यार्थी/उमेदवारांनी ॲपिअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. तरी दि. १४ ऑगस्ट २०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९,९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १०,७७९ ॲपिअर विद्यार्थी / उमेद‌वारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा /उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.


तथापि ज्या विद्यार्थी/ उमेद‌वारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास अ‌द्यापपर्यंत सादर केलेले नाही, अशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे ५,८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६,३१९ ॲपिअर वि‌द्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल.


तरी वि‌द्यार्थ्यांनी/ उमेदवारांनी अ‌द्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025 InfoAppear.aspx या लिंकमध्ये विहित मुदतीत माहिती सादर केली नाही, अशा विद्यार्थी/उमेदवारांनी दिलेल्या लिंक‌द्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे सोमवारी मुंबईत जोरदार स्वागत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा

 वृत्त क्र. 3368

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे

सोमवारी मुंबईत जोरदार स्वागत

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा

 

मुंबईदि. 17 : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार  उद्या दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल.

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली असून उद्या 18 ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल. विमानतळ प्राधिकरणाकडून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार सकाळी 10 वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बाईक रॅली काढूनचित्ररथावर विराजमान करुन ही तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे नेण्यात येईल. दरम्यानसंध्याकाळी वाजता सांस्कृतिक कार्य विभाग,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सांस्कृतिक कार्य संचालनालय,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे "सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन" सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगर पालक मंत्री ॲड.आशिष शेलार, श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्यासह  खासदार अनिल देसाई आमदार महेश सावंत,  सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

 सोमवार१८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजतापु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवीमुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाला  सर्वांनी उपस्थित रहावेअसे आवाहनपुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गेपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि सांस्कृतिक संचनालयाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.

तलवारीचे प्रदर्शन

श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शनदि. १९ ते दि.२५ ऑगस्ट २०२५सकाळी ११ ते सायं ७ दरम्यानपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवीमुंबई येथील कला दालनात सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

राज्यात 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

 राज्यात 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीचा इशारा


            मुंबईदि. 16 :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्रमुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारेराज्यात पुढील काही दिवसात 
16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
                                       संभाव्य पर्जन्यमान


            कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता.

            मराठवाडा मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. वीज चमकणेगडगडाटवादळी वारे (40) 50 किमी/ताशी) यांची शक्यता.

Featured post

Lakshvedhi