पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 16 August 2025
लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती.
दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज विस्तारित सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1
• मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे.
• सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आली होती.
• प्रकल्पाची एकूण लांबी 5.50 किमी असून यापैकी 3.85 कि.मी. लांबी 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामे केली जात आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध आहे.
यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मंडळे येथे उभारलेल्या ७० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेमुळे मेट्रो साठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून प्रशिक्षणासाठीचा खर्च वाचणार आहे. तर इतर राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठीचे मनुष्यबळ प्रशिक्षित करून महसूल मिळणार आहे. तसेच चेंबूर - सांताक्रुझ लिंक केबल स्टेड पूल, रोड भाग 1 हा अशिया खंडातील 100 मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल आहे. तसेच 90 कोटी रुपयांच्या मालवणी येथील कर्मचारी निवासस्थान इमारत ज्यामध्ये एकूण 156 सदनिका असणाऱ्या दोन इमारती आहेत. कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल तसेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील 5.25 कि.मी लांबीच्या विहार क्षेत्र, पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.c
मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेट्रो आणि इतर प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. काही प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसून, रोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करता, मुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

१५ ऑगस्ट) मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला
(१५ ऑगस्ट) मुंबईतील कोस्टल रोड नागरिकांसाठी २४ तास खुला असणार असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावे, संपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्ही च्या निरिक्षणाखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...