Saturday, 16 August 2025

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी

 गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी

शासनाची जोरदार तयारी

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा

 

मुंबईदि. १५ : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धाचौकाचौकात रोशनाईड्रोन शोविविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

याबाबत मंत्री ॲड. शेलार म्हणाले, "जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे."

Friday, 15 August 2025

महाराष्ट्र हे रेरा लागू करणारे पहिले राज्य

 महाराष्ट्र हे रेरा लागू करणारे पहिले राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीएमसीएचआयने दिलेल्या अनेक योग्य सूचनांमुळे आम्ही रेरा कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि रेरा कायदा अधिक कार्यक्षम बनवला. रेरा लागू झाल्यामुळे लोकांचा रिअल इस्टेट उद्योगावरचा विश्वास वाढला आहे. रेरा अस्तित्वात आल्यानंतर क्रेडाई एमसीएचआयने दरवर्षी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा सुरू केलीज्यामध्ये नियामकवित्तीय संस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्र एकत्र येतातत्यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह व्यवहाराची संधी मिळते. मुंबईत एमसीएचआयचे प्रदर्शन हे देशातील सर्वोत्तम प्रदर्शनांपैकी एक असून यामुळे ग्राहकांशी नातेसंबंध अधिक घट्ट झाले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. मुंबईसाठी नवीन विकास आराखडा तयार करतेवेळी मुंबईच्या विविधतेमुळे आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने येथे सीआरझेडलष्करनौदलवन विभाग अशा अनेक नियमांचा प्रभाव आहे. या सर्व अडचणींमधून एक विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. यामध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्र एकत्र आले आणि क्रेडाई-एमसीएचआयने या प्रक्रियेत अग्रणी भूमिका बजावली आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यासोबत सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीजगभरात उपलब्ध असलेली नवीन तंत्रज्ञान मुंबईत आणायला हवीत. आज बांधकाम क्षेत्रात अशा तंत्रज्ञानामुळे ८० मजली इमारत केवळ १२० दिवसांत बांधली जाऊ शकते. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेची कामे सुरू आहेत. सध्या बांद्रावर्सोवा सी-लिंक प्रकल्प ६० टक्के पूर्ण झाला आहे आणि पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेस-वे हा मुंबईतील ६० टक्के वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर अशी जोडणी सी-लिंकपासून भायंदर -विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वामुळे उत्तरेकडील संपूर्ण भाग रिअल इस्टेट उद्योगासाठी खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीसध्या मुंबईत पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.  बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द केला आहे. यामध्ये जवळपास १०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे. हा आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट देखील नवीन संधी निर्माण करत आहे. आज मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकलाआयकॉनिक इमारतीउत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

 झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 15 : मुंबई स्लम-फ्री करायची असेलपुनर्विकास जलद करायचा असेलतर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावीतरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पनानवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या क्रेडाई-एमसीएचआय आयोजित चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमलसचिव ऋषी मेहतामाजी सचिव धवल अजमेरामुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते.

महाॲग्री एआय धोरण

 मुंबईदि. 15 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात "महाॲग्री एआय धोरण" चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 19 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खाली दिलेल्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. कृषी विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

कृषी विभागाने "महाॲग्री एआय धोरण 2025-2029" नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अन्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर कसा करण्यात येणार आहेधोरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार आहेतया धोरणाचा उद्देशस्वरूप, "विकसित भारत 2047" सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेले धोरणातील उपक्रमराज्यात या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

000


कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप


 कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने

शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप

 

मुंबई, दि. 15 : कॉटन असोसिएशन इंडिया तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, हॉटेल ग्रीन स्टेशन, मुंबई येथे भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागांमधील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे सर्व संचालक विनय कोठारी, सुधीर मंत्री, श्याम मखारीया, पंकज नेपाणी, पंकज बंगडीवाला, मनीष डागा, मनीष शहा, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भामरे, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दिलीप हरी पवार, आनंदा चिन्ह, आबा मगन शिंपी, ईश्वर आत्माराम माळी, धनराज त्र्यंबक माळी, ज्ञानेश्वर संतोष पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेत असून शेतकऱ्यांना जे सहकार्य करता येईल ते करत असतो.

यावेळी भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.  

Featured post

Lakshvedhi