Friday, 15 August 2025

महाराष्ट्राची जागतिक झेप

 महाराष्ट्राची जागतिक झेप - पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील

 ‘टीटीएफच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसाहिल स्टेशनसमुद्रकिनारेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाची जिवंत उदाहरणे असलेले गड किल्लेयुनेस्को स्थळे असे  वैविध्यपूर्ण पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी फायदा झाला. शिवायमहाराष्ट्र राज्याने या प्रदर्शनात सहभाग दर्शविल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी अधिक रुची दाखविली. त्यामुळे येत्या काळात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेईल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.

*

पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ

 पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ

- पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे

महाराष्ट्र पर्यटन विभागाने या प्रदर्शनात सहभाग घेऊन या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील टीटीएफच्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भागधारकांनी पर्यटन सेवासुविधांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. या माध्यमातून भागधारकांना पर्यटन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी फायदा होणार आहेतसेच या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

 महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाला ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’ यांच्याकडून सर्वोत्कृष्ट दालनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख अधोरेखित केली आहे.

 टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग

महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

मुंबईदि. १४ :  वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत प्रदर्शनाचे  मे. फेअरफेस्ट मीडिया यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन ११  ते १३ ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले.

महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील टीटीएफच्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होणार आहेया प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने १०० चौरस फूट दालन उभारुन सहभागी होऊन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत ३५ हून अधिक भागधारकांना महाराष्ट्र दालनात सामावून घेऊन पर्यटन सेवांविषयी माहिती पर्यटक / व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. यात टूर ऑपरेटररिसोर्टकृषी पर्यटन केंद्रवन्यजीव पर्यटन ऑपरेटरकॅराव्हॅन पर्यटन ऑपरेटरसहल मार्गदर्शक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र दालनाला पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांतील घटकांनी भेट दिलीतसेच महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक जाणून घेण्याची रुचीही दाखविली.

या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रत्या ठिकाणी जाण्याची सोयउपलब्ध सेवा सुविधा इत्यादी माहिती पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने भागधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. 

टीटीएफ प्रदर्शनात दरवर्षी ५०० प्रदर्शक आणि १० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात.  या ट्रॅव्हल ट्रेड फेअरमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने असतात. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

 राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

 

मुंबईदि. १४ : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेला ध्यास धरावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातनाविस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ पासून हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन रोजगार आणि उद्योगास आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आयटीआयमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानसोबतच सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान असणे आवश्यक असल्याने मंत्री श्री. लोढा यांनी आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वृद्धिगत करणारा कार्यक्रम आयोजित करावा असे निदेश दिले होते. याच श्रुंखलेतील एक भाग म्हणून ऑगस्ट महिन्यात विभाजन विभीषिका स्मरण दिवस पाळण्यात आला. त्यानुसार राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयच्या सुमारे एक हजार संस्थांमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. विविध संस्थांमध्ये फाळणी संदर्भात चित्र प्रदर्शनव्याख्याने आणि नाटक सादर करून विद्यार्थ्यांना भारताच्या त्या काळ्या अध्यायाशी परिचित करण्यात आले. तसेच भावी पिढीत सामाजिक समरसता अबाधित राहून विघटनाच्या विचारापासून दूर राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

**

डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल

 डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल मंत्री ॲड.आशिष शेलार

डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विठ्ठलाचे नाव घेत लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरुन मुंबईची ओळख द्विगुणित करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री ॲड. शेलार यांनीगिरणी कामगारबीडीडी चाळधारावीकामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधवपदपथावरील विक्रेते यांसारख्या विविध घटकांसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गृहनिर्माण व पुनर्विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी जगातले 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून त्यांची पुढची पिढीच या केंद्राचे संचालन करणार असल्याची माहिती दिली.

प्रारंभी डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गवांदे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या 135 वर्षांच्या परंपरेची माहिती देऊन कोविड काळात काम ठप्प असताना नागरिकांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

दहिहंडी उत्सव



 अलिबाग मधील पीएनपी होली चाईल्ड शाळेत आज दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी थरावर थर रचून द

हीहंडी फोडली.

Featured post

Lakshvedhi