Friday, 15 August 2025

१०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीसध्या मुंबईत पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.  बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द केला आहे. यामध्ये जवळपास १०० वर्षं १६१ चौ.फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ.फूट जागा मिळत आहे. हा आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट देखील नवीन संधी निर्माण करत आहे. आज मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकलाआयकॉनिक इमारतीउत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

 झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 15 : मुंबई स्लम-फ्री करायची असेलपुनर्विकास जलद करायचा असेलतर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावीतरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पनानवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या क्रेडाई-एमसीएचआय आयोजित चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष डॉमिनिक रोमलसचिव ऋषी मेहतामाजी सचिव धवल अजमेरामुख्य कार्यकारी अधिकारी केवल वलांभिया तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते.

महाॲग्री एआय धोरण

 मुंबईदि. 15 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात "महाॲग्री एआय धोरण" चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 19 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खाली दिलेल्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येणार आहे. कृषी विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

कृषी विभागाने "महाॲग्री एआय धोरण 2025-2029" नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अन्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर कसा करण्यात येणार आहेधोरणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार आहेतया धोरणाचा उद्देशस्वरूप, "विकसित भारत 2047" सारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत असलेले धोरणातील उपक्रमराज्यात या धोरणाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

000


कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप


 कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने

शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप

 

मुंबई, दि. 15 : कॉटन असोसिएशन इंडिया तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, हॉटेल ग्रीन स्टेशन, मुंबई येथे भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागांमधील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे सर्व संचालक विनय कोठारी, सुधीर मंत्री, श्याम मखारीया, पंकज नेपाणी, पंकज बंगडीवाला, मनीष डागा, मनीष शहा, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भामरे, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दिलीप हरी पवार, आनंदा चिन्ह, आबा मगन शिंपी, ईश्वर आत्माराम माळी, धनराज त्र्यंबक माळी, ज्ञानेश्वर संतोष पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कॉटन असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेत असून शेतकऱ्यांना जे सहकार्य करता येईल ते करत असतो.

यावेळी भारतीय कपास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.  

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

 विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

 

मुंबईदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहेहा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

 लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले 

पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

 

नवी दिल्ली१५ : लाल किल्ल्यावर झालेल्या ७९ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या परेडमध्ये महाराष्ट्राची मुलगी लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथक प्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली.

            मूळच्या नागपूरच्या असलेल्या जुई भोपे यांनी २०१५ साली भारतीय नौदलात प्रवेश केला असून सध्या त्या लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना सुरक्षा आणि संचलनाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला.

मागील वर्षी झालेल्या गणराज्य दिन परेडमध्येही जुई भोपे यांनी भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व केले होते. त्यांचे शिक्षण नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमध्ये झाले असूनपुढे रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाल्याने लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांच्या कार्याचा सर्व स्तरातून गौरव होत आहे.

'गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा

 हा 'गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचाशासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आनंद होत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. याबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम यांचे दोन स्वतंत्र सविस्तर शासन निर्णय ही जारी करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकदामी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन व समन्वय करण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi