Friday, 15 August 2025

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

 भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त

विधान भवन येथे ध्वजारोहण

 

मुंबईदि. 15 : विधान भवनमुंबई येथे आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्तेविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळेसचिव मेघना तळेकरसचिव डॉ.विलास आठवलेसचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. 

या प्रसंगी सभापती यांनी भारताच्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करीत राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. तसेच भारताला सामर्थ्यशाली आणि वैभवशाली बनविण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प सिद्धीस जावा अशी मनोकामना व्यक्त करुन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

****

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना , थोर नेत्यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

 ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतरत्यांनी  मंत्रालयातील राजमाता जिजाऊछत्रपती शिवाजी महाराजमहात्मा ज्योतिराव फुलेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त या समारंभात सांस्कृतिक संचालनालयाकडून प्रमुख सनई वादक कलाकार किरण शिंदेसहकलाकार अरुण शिंदेविवेक शिंदे यांनी सनई चौघडे वादन केले.

0000

पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर,समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग

 पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्तेविमानतळ सोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे. हे बंदर जगातलं दहाव्या क्रमांकाच्या पहिल्या दहा बंदरामध्ये आहे.  यामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मेरिटाइम पॉवर होणार आहे. त्याच वेळी पुणेमुंबईनागपूरगडचिरोलीअमरावतीछत्रपती संभाजीनगर या विमानतळांचेनवीन विमानतळ बांधणे किंवा आधुनिकीकरण हे कार्यसुद्धा सुरु आहे.

समृद्धी महामार्गशक्तीपीठ महामार्ग यातून महामार्गांचे जाळे तयार करतो आहे. त्यासोबतएक हजार लोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे. आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे. त्या दृष्टीने येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजसंतांच्या मांदियाळींनी  दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अनुरूप आपला महाराष्ट्र यापुढेही चालत राहीलअशा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

गडचिरोली : नवीन स्टील हब

 गडचिरोली : नवीन स्टील हब

महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलांनीपोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केलेले आहे. गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षल मुक्तमाओवादी मुक्त केले आहे. गडचिरोली हे आता देशाचे नवीन स्टील हब म्हणून तयार होत आहे. पुढच्या दहा वर्षांमध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी तयार होणार आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहेहे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे तळ उद्वस्त केले. त्यातून भारतावरील होणारे हल्ले परतवून लावले. यामुळे जगाला देखील नवीन भारत काय आहेहे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या-ज्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतोत्यांचे आभार मानतो.

आज भारताची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने ठोस पाऊल ठेवले आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातले जे उत्पादन आहेज्या व्यवस्था आहेतत्या सगळ्या भारतामध्ये गुणवत्तापूर्ण तयार कराव्या लागतील. नवाचारस्टार्टअप्सटेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे उभ्या कराव्या लागतील. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशीचे आव्हान केले आहे. जिथे जिथे शक्य असेलत्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्याचे कार्य करायचे आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

 विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

 

मुंबईदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहेहा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने

नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 

मुंबईदि. १४ :- वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

             वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उपायुक्त महानगरपालिका सदर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्याने सहाय्यक आयुक्त महानगरपालिका एक पदाससाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने सदर पदाच्या जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करूणा जुईकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi