Friday, 15 August 2025

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

 टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग

महाराष्ट्राचे दालन ठरले सर्वोत्कृष्ट

मुंबईदि. १४ :  वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत प्रदर्शनाचे  मे. फेअरफेस्ट मीडिया यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन ११  ते १३ ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले.

महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील टीटीएफच्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होणार आहेया प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने १०० चौरस फूट दालन उभारुन सहभागी होऊन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत ३५ हून अधिक भागधारकांना महाराष्ट्र दालनात सामावून घेऊन पर्यटन सेवांविषयी माहिती पर्यटक / व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. यात टूर ऑपरेटररिसोर्टकृषी पर्यटन केंद्रवन्यजीव पर्यटन ऑपरेटरकॅराव्हॅन पर्यटन ऑपरेटरसहल मार्गदर्शक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र दालनाला पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांतील घटकांनी भेट दिलीतसेच महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक जाणून घेण्याची रुचीही दाखविली या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इत्यादी माहिती पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने भागधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. 


टीटीएफ प्रदर्शनात दरवर्षी ५०० प्रदर्शक आणि १० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात. या ट्रॅव्हल ट्रेड फेअरमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने असतात. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

 राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

 

मुंबईदि. १४ : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेला ध्यास धरावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातनाविस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ पासून हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.

डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल -

 डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल - मंत्री ॲड.आशिष शेलार

आमदार श्रीकांत भारतीय यांनी जगातले 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून त्यांची पुढची पिढीच या केंद्राचे संचालन करणार असल्याची माहिती दिली.


प्रारंभी डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गवांदे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या 135 वर्षांच्या परंपरेची माहिती देऊन कोविड काळात काम ठप्प असताना नागरिकांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल -

 डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल मंत्री ॲड.आशिष शेलार

डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विठ्ठलाचे नाव घेत लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरुन मुंबईची ओळख द्विगुणित करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री ॲड. शेलार यांनीगिरणी कामगारबीडीडी चाळधारावीकामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधवपदपथावरील विक्रेते यांसारख्या विविध घटकांसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गृहनिर्माण व पुनर्विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर;

 डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर;

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 

मुंबईदि .१४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआमदार श्रीकांत भारतीययोगेश सागरतमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेसचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले१३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करताएकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवासडबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनीवारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे श्री.त्रिपाठी यांचेतसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Thursday, 14 August 2025

मराठी भाषा विभागामार्फत "अभिजात मराठी माझ्या अपेक्षा" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 मराठी भाषा विभागामार्फत "अभिजात मराठी

 माझ्या अपेक्षा" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर

मुंबईदि. १४ : केंद्र शासनाच्या  ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे - मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. "अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा" या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड "मराठी भाषा दूत" म्हणून करण्यात येईल. तसेचसर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५रात्री १२ पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावीअसे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने

नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 

मुंबईदि. १४ :- वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

             वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उपायुक्त महानगरपालिका सदर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्याने सहाय्यक आयुक्त महानगरपालिका एक पदाससाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने सदर पदाच्या जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करूणा जुईकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi