Friday, 15 August 2025

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर;

 डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर;

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

 

मुंबईदि .१४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआमदार श्रीकांत भारतीययोगेश सागरतमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेसचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले१३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करताएकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवासडबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनीवारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे श्री.त्रिपाठी यांचेतसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Thursday, 14 August 2025

मराठी भाषा विभागामार्फत "अभिजात मराठी माझ्या अपेक्षा" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 मराठी भाषा विभागामार्फत "अभिजात मराठी

 माझ्या अपेक्षा" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर

मुंबईदि. १४ : केंद्र शासनाच्या  ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे - मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. "अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा" या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड "मराठी भाषा दूत" म्हणून करण्यात येईल. तसेचसर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५रात्री १२ पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावीअसे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त करार पद्धतीने

नेमणुकीच्या जाहिरातीस मुदतवाढ

 

मुंबईदि. १४ :- वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

             वित्त विभागाच्या सहावा महाराष्ट्र वित्त आयोग अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उपायुक्त महानगरपालिका सदर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्याने सहाय्यक आयुक्त महानगरपालिका एक पदाससाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने सदर पदाच्या जाहिरातीस आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करूणा जुईकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जुलै - २०२५ मधील मासिक तसेच साप्ताहिक सोडतीचे निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जुलै - २०२५ मधील

मासिक तसेच साप्ताहिक सोडतीचे निकाल जाहीर

 

मुंबईदि. १४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. जुलै-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १३,१८० तिकिटांना ५४ लाख ६० हजार ९५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ६२,६०९ तिकीटांना रू. २ कोटी २४ लाख १ हजार ४०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेतअसे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 माहे जुलै-२०२५ मध्ये १५ जुलै२०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री१६ जुलै२०२५ रोजी महाराष्ट्र गौरव२२ जुलै,२०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी आषाढी विशेष२६ जुलै२०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी२९ जुलै२०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

 या लॉटरी तिकिटांना जाहीर झालेले बक्षीस पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी आषाढी विशेष तिकीट क्रमांक GS ०४ - ०७५७ या श्री गुरुदेवदत्त लॉटरी एजन्सी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.

 महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम ८ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे एकूण आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

 सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम दहा हजारावरील वरील बक्षिसांची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 

३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. १४ : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपीपाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.

वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपीबसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपीन बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापिदिनांक ३०.११.२०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाहीयाची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावीतरी एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावीअसे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

Maharashtra Governor greets people on Independence Day

 Maharashtra Governor greets people on Independence Day

Mumbai, 14 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan has greeted the people of Maharashtra on the occasion of Independence Day. In a message the Governor wrote:

"On the auspicious occasion of the 79th Independence Day, I extend my heartiest greetings to all the citizens of Maharashtra. This day reminds us of the sacrifices made by numerous known and unknown freedom fighters, revolutionaries and ordinary citizens to secure independence.

Maharashtra has had a rich legacy of Saints and social reformers who have guided our society on the path of righteousness, justice, and equality. 

Since attaining independence, Maharashtra has made remarkable strides in socio-economic development. Our State has been at the forefront of industrial development, education, agriculture and culture. 

I am confident Maharashtra will play a pivotal role in achieving the dream of a Viksit Bharat. Let us all join hands to contribute to the nation’s progress and ensure that the ideals of freedom, equality, and justice are cherished."

Governor to hoist National Flag in Pune

Governor C. P. Radhakrishnan will hoist the National flag on the occasion of the 79th Independence Day at Council Hall, Pune at 09.05 am on Friday (15th Aug.)

Independence Day Reception

The Governor will host the traditional Independence Reception for the invitees on the lawns of Raj Bhavan Pune

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १४ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

"देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस अनेक ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्य संग्राम सैनिकक्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राने सामाजिक-आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपले राज्य उद्योगमाहिती तंत्रज्ञानशिक्षणशेती आणि संस्कृती क्षेत्रांत आघाडीवर आहे. 

समृद्ध आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावेलअसा मला विश्वास वाटतो. देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी एकजूट होऊया आणि स्वातंत्र्यसमता आणि न्यायाचे आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम ठेवूया"असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

राज्यपालांचे झेंडावंदन पुणे येथे

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन शुक्रवारी (दि. १५) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावुन मानवंदना देणार आहेत.

परंपरेनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांनी सायंकाळी राजभवनपुणे येथे निमंत्रितांसाठी चहापानाचे देखील आयोजन केले आहे.

Featured post

Lakshvedhi