Friday, 15 August 2025

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता

३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. १४ : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपीपाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.

वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपीबसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपीन बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापिदिनांक ३०.११.२०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाहीयाची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावीतरी एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावीअसे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.


कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

 कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

• कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.

• कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या 340 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रुंदीच्या पुलासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.

• उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरातही केवळ काही मिनिटांची नव्हेतर दररोज हजारो तासांची बचत होईल.

मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

 मालवणीमालाड (प)मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.

• त्याप्रमाणेमेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोपमालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असूनइमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.

देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

 देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई

मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊनमुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.

• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटरसैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकामसिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.

• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेलखर्चाची बचत होईलतसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.

• निवासी सुविधाडिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.

• प्रकल्प खर्च७० कोटी रुपये

पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते

 • केबल स्टेड ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅनआहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टीलडेकचा समावेश आहे. ब्रीजमधील केबल स्टेड ब्रीजच्या सुपरस्ट्रक्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्यामुळे ब्रीजच्या-पिअर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टेड ब्रीजची रुदी 10.50 मी. ते 17.20 मी. पर्यंत असून हा दोन मार्गिकेचा ब्रीज आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो. पुढे हि मार्गिका सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते  प्रकल्पाचा              एकूण खर्च : २०० कोटी रुपये.                       .फायदे: कुर्ला ते विमानतळ दरम्यान सिग्नलविरहित प्रवास, पश्चिम द्रुतगती महामार्ग वरील हंसभुग्रा जंक्शन, वाकोला जंक्शन येथिल वाहतुक कॉडी सुटेल, प्रवासाचा वेळ आणि इंधानाची बचत होईल

पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित

 पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 लोकार्पण

 • सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण 

Featured post

Lakshvedhi